इंदापूर || इंदापूर तालुक्यात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा विकास निधी विविध विकास कामांसाठी येत असून आज पळसदेव बिजवडी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
पळसदेव बिजवडी जिल्हा परिषद गटातील गावामध्ये ९७ कोटी २४ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन आज २१ मे रोजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तसेच सायंकाळी ६.३० वाजता पळसदेव येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी पळसदेव- बीजवडी गटातील पळसदेव, चांडगाव,लोणी देवकर, करेवाडी, वरकुटे, कळाशी, बळपुडी, न्हावी, रुई, बिजवडी, गंगावळण,अगोती १,२,३, कालठण १,२,भावडी, शिरसोडी,पिंपरी खुर्द,पडस्थळ,अजोती,सुगाव, कौठळी,गलांडवाडी १, माळवाडी १,२ या गावातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समिती चे माजी सभापती प्रवीण माने, प्रतापराव पाटील, श्रीमंत ढोले, दीपक जाधव, प्रशांत पाटील,तालूका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, सचिन सपकाळ,कार्याध्यक्ष अतुल झगडे,अभिजित ताबिले, बाळासाहेब काळे, अमोल भिसे, बापू शेंडे उपस्थित राहणार आहेत.