अभिमानास्पद: इंडियन मेडिकल असोसिएशन इंदापूर शाखेचा चार राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव.

इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्याची राज्यस्तरीय डॉक्टरांची परिषद नुकतीच अमरावती येथे पार पडली यामध्ये इंदापूर शाखेला चार राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.बेस्ट स्मॉल ब्रांच इंदापूर असा गौरव करत डॉ. कल्पना खाडे यांना बेस्ट प्रेसिडेंट, बेस्ट सेक्रेटरी म्हणून डॉक्टर प्रतिभा वनवे, आओ गाव चले या संकल्पनेची उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल विशेष पुरस्कारही यावेळी देण्यात आला सदरचा पुरस्कार हा खासदार अनिल बोंडे,इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र कुटे व सचिव डॉक्टर संतोष कदम यांच्या हस्ते देण्यात आला. एकंदरीतच इंदापूर शाखेच्या वतीने इंडियन मेडिकल असोसिएशन इंदापूरच्या अध्यक्षा डॉक्टर कल्पना खाडे ,सचिव डॉक्टर प्रतिभा वनवे,डॉक्टर मिलिंद खाडे व डॉक्टर अतुल वनवे यांनी हे पुरस्कार स्वीकारले. आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच एका वेळी चार राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशन इंदापूरचे मार्गदर्शक डॉक्टर राम आरणकर व इतर सर्व सदस्यांनी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. इंडियन मेडिकल असोसिएशन या संलग्न डॉक्टरांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल इंदापूर तालुक्यातील नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here