जुन्या बांधकामाचे उत्खनन करताना काही जुनी शस्त्रे सापडल्याची उदाहरणे आपण ऐकले आहेत.परंतु एखाद्या मराठी माध्यमाच्या शाळेत जिवंत स्वरूपाचा बॉम्ब आढळला हे उदाहरण पालक वर्गांमध्ये निश्चितच भीतीचे वातावरण निर्माण करणारे असेल. असेच काही घडलं आहे ते आपल्या महाराष्ट्रात.महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील एका शाळेच्या वर्गातून हातबॉम्ब सापडला आहे. वर्गात पडलेला हँडग्रेनेड त्याच शाळेतील विद्यार्थ्यांच्या एका गटाच्या लक्षात आला.शाळेच्या वर्गात हातबॉम्ब कसा पोहोचला याची ठोस माहिती अद्याप समोर आलेली नाही. शाळेत स्फोटके सापडल्यानंतर आजूबाजूच्या लोकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.स्फोटकांवर अरबी भाषेत काही शब्द लिहिलेले आहेत स्फोटकांमध्ये अरबी अक्षरांचे काही शब्द कोरले आहेत.या घटनेबाबत पोलीस निरीक्षक अजय सिदनकर म्हणाले, सांगली जिल्ह्यातील कुदनूर गावात एका मराठी माध्यमाच्या शाळेतून हातबॉम्ब सापडला आहे. खेळादरम्यान काही विद्यार्थ्यांचा चेंडू खिडकीतून आत गेल्यावर हँडग्रेनेड त्यांच्या लक्षात आला. हँडग्रेनेडची माहिती मिळताच पोलिसांनी बॉम्ब निकामी पथकासह तात्काळ शाळेत पोहोचले. तसेच स्निफर डॉग्स होते.शाळेच्या वर्गखोल्यातील हँडग्रेनेड बाहेर काढल्यानंतर बॉम्ब पोलिस आणि बॉम्बशोधक पथकाने तो सुरक्षितपणे निकामी केला. राज्यातील शाळेत हातबॉम्ब सापडण्याची ही दुसरी घटना आहे.याआधीही 2017 मध्ये याच कुदनूर गावात दोन हातबॉम्ब सापडले होते. सध्या जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत बांधकाम सुरू आहे. त्यामुळेच सध्या ही शाळा सदाशिव तुकाराम वनमाने नावाच्या व्यक्तीच्या इमारतीत चालवली जात आहे. इमारतीतील दोन खोल्या जुन्या व मोडकळीस आल्याने या खोल्यांमध्ये मुले बसत नाहीत. मुलांचे वर्ग बाहेरच्या खोल्यांमध्ये आयोजित केले जातात. यातील एका जुन्या खोलीत हँडग्रेनेड ठेवण्यात आला होता. हे घर पोलीस खात्यातील कर्मचारी असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, पोलिसांची कारवाई सुरू झाली आहे. या घटनेनंंतर मात्र सर्व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महाराष्ट्रभर याबाबत सुलट चर्चाा चालू झाल्याा आहेत.
Home Uncategorized अबब…! मराठी माध्यम असलेल्या शाळेत सापडला चक्क हातबॉम्ब..हातबॉम्बवर कोरले होते काही अरबी...