….अन्यथा शिवसेना स्टाईलने बुधवारी आंदोलन- शिवसेना बाळासाहेबांच्या वाघांची इंदापुरात आक्रमक भूमिका.

👉 इंदापूर शहरातून होत असलेली अवजड वाहतूक बंद करा- पै.अशोकराव देवकर बाळासाहेबाची शिवसेना शहर प्रमुख इंदापूर,
इंदापूर:-इंदापूर तालुक्यामध्ये सद्यस्थितीला बाळासाहेबांच्या शिवसैनिकांची वेगवेगळ्या विषयांमध्ये सहभाग घेऊन आक्रमक भूमिका दाखवण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यात माजी मंत्री विजय बापू शिवतारे यांनी बाळासाहेबांच्या शिवसैनिकांची बैठक घेऊन त्यांना एक बळ देण्याचा प्रयत्न केले होता. आज याच बाळासाहेबांच्या शिवसेनेतल्या शिवसैनिकांनी वेगवेगळ्या विभागाला पत्रव्यवहार करून एका गंभीर विषयाची दखल घेण्याची विनंती केली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की, विभागाच्या अंतर्गत येत असलेला जुना पुणे-सोलापूर हायवे हा इंदापूर शहरातून जात आहे. या रोडवरून अवडजड वाहतूक सुरू आहे. या वाहतुकीमुळे अत्तापर्यंत बरेच अपघात झालेले आहेत. याच रोडवर कॉलेज, हायस्कूल, प्राथमिक शाळा, बँका तसेच आठवडे बाजार आहे. या रस्तावरून शाळकरी मुले ये-जा करत असुन रस्त्याच्या कडेला असलेले फुटपाथवर अनाधिकृत व्यवसायकांचे अतिक्रम झाले असल्याने मुलांना व जेष्ठ नागरीकांना रस्त्यावरून ये-जा करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. दि. १० डिसेंबर रोजी एका निष्पाप मुलीचा अशाच अवजड वाहनामुळे जीव गमवावा लागला आहे.जिव गेल्यावर च प्रशासन जागे होणार काय आजून किती जिव घेणार आहात?, दोन दिवसात शहरातून होत असलेली अवजड वाहनाची वाहतूक कायमस्वरूपी बंद करण्यात यावी. तसेच अवजड वाहने शहरात येऊ नये म्हणून शहराच्या बाहेर (बायपास जवळ) आकारण्यात येणाऱ्या दंडाचा बोर्ड कायामस्वरूपाचा बसविण्यात यावा.व नियमानुसार योग्य ती कारवाई व दंड करण्यात यावा.व कायमस्वरूपी वाहतूक शाखेचे २ कर्मचारी नेमणूक करण्यात यावी. अन्यथा बुधवार दि. १४ डिसेंबर २०२२ रोजी इंदापूर आय कॉलेज समोर रस्ता रोको आंदोलन केले जाईल अशी आक्रमक भूमिका आता शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाच्या इंदापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. पै.अशोकराव देवकर बाळासाहेबाची शिवसेना शहर प्रमुख इंदापूर, जि. पुणे यांनी, उपविभागीय अभियंता सा.बा.इंदापूर, तहसिल कार्यालय, इंदापूर मा. पोलीस निरीक्षक सो.,इंदापूर पोलीस स्टेशन, इंदापूर मा. मुख्याधिकारीसो इंदापूर नगरपरिषद, इंदापूर याना निवेदन दिले आसल्याचे देवकर यांनी सांगितले, या वेळेस श्री.अण्णासाहेब जगन्नाथ काळे, इंदापूर तालुका प्रमुख श्री.बालाजी गुणवंतराव पाटील , श्री. सुरज वसंत काळे,बबन खराडे, निशा शिंदे, अण्णासाहेब काळे, देवा मगर, हरून शेख, दुर्गा शिंदे, रमेश साळुंखे, ज्ञानेश्वर चौगुले, बालाजी पाटील ,शुभम राखुंडे, रमेश साळुंखे,हे शिवसैनिक उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here