👉केंद्र शासनाचा निषेध करत शेतकऱ्यांकडून मोफत कांद्याचे वाटप
उपसंपादक निलकंठ भोंग
निमगाव केतकी येथील सुवर्णयुग गणेश मंदिर येथे संविधानिक मार्गाने सरकारने कांदा निर्यात सुरू करावी, शेतकऱ्यांनी विकलेल्या कांद्याला एक हजार रुपये प्रतिक्विंटल अनुदान द्यावे.
यासाठी आंदोलन करण्यात आले.
भारत देशात महाराष्ट्रामध्ये कांद्याचे विक्रमी उत्पादन झाले असून देखील शेतकऱ्यांचा ४०% पेक्षा जास्त कांदा चाळीत साठवण करावा लागत आहे. साठवण केलेला कांदा सडत चालल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. आणि शाळेतून बाहेर काढून विक्रीसाठी काढला तर कांद्याचे दर पडलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये शेतकरी कोंडीमध्ये सापडला आहे. ,गेल्या हंगामात कांद्याला २५-३० रुपये किलो दर मिळाला होता. यावेळी मात्र ९ ते १४ पर्यंत दर मिळत आहे. कांदा उत्पादनाचा एकंदरीत प्रति क्विंटल खर्च १८०० ते २००० च्या दरम्यान आहे ,अशा वेळेस प्रति क्विंटल हजार रुपयापर्यंत थेट तोटा उत्पादकांना बसत आहे.यावेळी शेतकरी सुकाणू समितीचे अध्यक्ष ॲड. श्रीकांत करे यांनी जमलेल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच सरकारच्या धोरणाचा निषेध करत शेतकऱ्यांकडून मोफत कांदा वाटण्यात आला.
यावेळी बापू चांदणे, ॲड.मुलाणी, ॲड.रोहित लोणकर ॲड.संदीप शेंडे, राजकुमार भोंग, प्रवीण डोंगरे, दादासो किरकत, मंगेश घाडगे, धनंजय राऊत, दत्तात्रय मिसाळ, विलास मिसाळ तसेच शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home Uncategorized अनोखे आंदोलन: केंद्र शासनाने कांद्याची निर्यात बंदी हटवण्यासाठी निमगाव केतकी येथे गांधीगिरी...