अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर कौठळी गावामध्ये लालपरीचे आगमन… गावकऱ्यांनी केले उत्साहात स्वागत.

कोरोना काळामध्ये अवघ्या जगाचे दिन चक्र व अर्थचक्र विस्कळीत झालेले होते. आजही ती विस्कळलेली घडी पूर्णपणे बसलेली दिसून आलेली नाही.अर्थव्यवस्थेमध्ये ज्या पद्धतीने व ज्या प्रमाणात प्रगतीचा आलेख अपेक्षित होता त्या प्रमाणात तो प्रगतीचा आलेख दिसून येत नाही याचाच अर्थ असा की कोरोना काळापासून अनेक व्यापारी शेतकरी यांना कोरोना महामारीचा दुष्परिणाम झालेला दिसून येतो.
ग्रामीण भागातील दळणवळणाचे मुख्य साधन समजले जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरी वरही याचा परिणाम झालेला दिसून आला होता. ग्रामीण भागात या लालपरी मुळे शेतकरी,विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिक यांना दळणवळण सोपे झालेले होते. परंतु कोरोना नंतर बहुतांशी गावांमध्ये बससेवा बंद करण्यात आली होती.
इंदापूर तालुक्यात कौठळी गावांमध्ये गेल्या दोन वर्षापासून इंदापूर ते कौठळी ही गाडी येत नसल्याने अनेक नागरिक व विद्यार्थ्यांना जाणे येण्यासाठी अडचण निर्माण झालेली होती आणि हीच अडचण भाजपाच्या सोशल मीडियाचे इंदापूर तालुकाप्रमुख पैलवान साहेबराव पिसाळ यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी इंदापूरच्या आगारप्रमुख श्री मनेर साहेब यांना एक निवेदन देऊन पुन्हा लाल परी आपल्या गावात यावी अशी विनंती केली. कर्तव्यदक्ष अधिकारी मनेर साहेब यांनी सर्व विद्यार्थी व शेतकऱ्यांची गरज ओळखून कौठळी गावांमध्ये पुन्हा बस सेवा चालू केली.आज कौठळी गावामध्ये ही लालपरी आल्यानंतर सर्व ग्रामस्थांनी आनंदाने या लालपरीचे स्वागत केले त्याचप्रमाणे लालपरीचे चालक शितल क्षीरसागर व वाहक विनोद लोंढे यांचा ग्रामस्थांनी सत्कारही केला.या आनंदपूर्ण स्वागताच्या कार्यक्रमास भाजपाचे इंदापूर तालुका सोशल मीडिया अध्यक्ष पैलवान साहेबराव पिसाळ, माजी उपसरपंच मुरलीधर बापू चितारे, ग्रामपंचायत सदस्य बापू चितारे, युवा नेते सौरभ तरंगे, पैलवान किरण मारकड, रमेश मारकड, राजेंद्र पिसाळ, नितीन पाटोळे, गणेश माने,किरण माने,आबा माने, विजय मारकड, ऋषिकेश बंडगर सुरज मोरे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here