इंदापुर: महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्हा पालकमंत्री मा.ना.श्री.दत्तात्रय (मामा )भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या,मदतीसाठी आपुलकीने व हक्काने सर्वांच्या पाठीशी उभे राहत आलेले कै.भगवानराव भरणे प्रतिष्ठान.या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री.अनिकेत नाना भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त अंथुर्णे व भरणेवाडी ग्रामस्थांच्या वतीने मोफत ई-श्रम कार्ड वाटप व पोलिस भरतीपुर्व प्रशिक्षणार्थीना मोफत किटचे अनावरण व वाटप, इंदापूर चे गटविकास अधिकारी मा.श्री.विजयकुमार परिट साहेब, भिगवण पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री दिलीप पवार साहेब व वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री.बी लातुरे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले, तसेच प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.अनिकेत नानांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी भरणेवाडी ग्रामपंचायतचे सरपंच श्री.दीपक भरणे प्रगतशील बागायतदार श्री.निलेश धापटे पाटील,दिपक गलांडे,नागेश धुमाळ यांच्यासह तसेच प्रतिष्ठानचे सदस्य, प्रशिक्षणार्थी व ग्रामस्थ यांनी उपस्थित राहून अनिकेत नानांना शुभेच्छा दिल्या व वेळोवेळी तत्पर मदत प्रतिष्ठानच्या माध्यमातून करत असलेल्या सामाजिक, आर्थिक, आरोग्य तसेच शैक्षणिक मदतीबद्दल आभार व्यक्त केले.