रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांचे पून्हा एकदा 4 महिन्या चे पगार ठेकेदाराकडून रखडले.संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून भारतीय जनता पक्षा कडे अडचण सोडविण्याची विनंती केली. दिनांक 16/2/2023 रोजी भारतीय जनता पक्ष भटकेविमुक्त आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस गजानन वाकसे व भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा प्रदेश सचिव आकाश कांबळे यांनी रुग्णवाहीका संघटनेचे अध्यक्ष काळूराम सस्ते,संघटनेचे उपाध्यक्ष सरवदे व महेश रुपनर यांच्यासोबत पुणे जिल्हापरिषद येथ जाऊन सर्व परिस्थिती जाणून घेतली. महाराष्ट्रातील कंञाटी रुग्णावाहीका चालकांचे वेतन आगोदर पंचायत समिती मार्फत दिला जात होता परंतू पाठीमागील काँग्रेस + राष्ट्रवादी सरकारच्या कळात यात बदल करून चालक पुरवण्यासाठी ठेकेदार नियुक्त करण्यात आली.त्यावेळे पासून या ठेकेदाराकडून रुग्णवाहिका चालकांना कधिच अविरत दर महा वेतन मिळालेले नाहीत.या चालकांना शासन 14900 पगार देत आहे परंतू प्रत्यक्ष माञ 9900 रुपये या चालकाला मिळत आहेत, बाकी रक्कम कुठे जाते ? भविष्य निर्वाह निधी वजा केला तरी देखील रकमेत खुप तफावत आहे.या व अन्य समस्यांबाबत तर आरोग्य उपसंचालक राधाकिशन पवार व पुणे जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार यांची भेट घेऊन चालकांचे 2 महिन्याचे पगार 2 दिवसात तातडीने काढण्याचे आश्वासन घेतले. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांसह प्रदेश अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात उपमुख्यमंञी यांना भेटून पगार प्रक्रिया पूर्ववत करण्याबाबत पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे वाकसे यांनी सांगीतले