अतिक्रमण विरोधी कारवाईने ‘मंगेश देवरे’ ठरले श्रीगोंदा नगरपरिषदेचे दबंग मुख्याधिकारी..!

श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी: वैभव मेथा
श्रीगोंदा शहरामध्ये अनेक वर्षांपासुन प्रलंबित असलेला मुख्य विषय म्हणजे शहरातील वाढत असलेले अतिक्रमण. हे अतिक्रमण दि.२५ मे ते दि.२८ मे २०२२ रोजी या कालावधीत मुख्य रस्त्यावरील सर्व अतिक्रमणे हटवण्यात येणार असल्याची माहिती श्रीगोंदा नगरपरिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी दिली आहे. त्या अनुषंगाने आज प्रत्यक्षात पोलीस निरिक्षक रामराव ढिकले यांचे मोठ्या फौजफाट्यासह, नायब तहसीलदार पंकज नेवसे, पंचायत समितीचे अधिकारी व नगरपरिषदेच्या सर्व विभागाचे अधिकारी आणि कर्मचा-यांच्या उपस्थितीमध्ये अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे.
या कारवाईमुळे काही धिट अतिक्रमणधारकांचे धाबे यामुळे दणाणले आहेत. या मध्ये मुख्यत: नगरपरिषद हद्दीतील दौंड-जामखेड रस्ता, मांडवगण रस्ता, शनिचौक ते जोधपुर मारुती रस्ता, शनिचौक ते वडाळी रस्ता अश्या मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात झाली आहे. अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यासाठी दंगल नियंत्रण पथकाचा व पोलिसांचा खुप मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. अतिक्रमण हटविण्याबाबत श्रीगोंदा नगरपरिषदेने वर्तमानपत्रात जाहीर नोटीस दिली होती. तसेच स्पिकर गाडी ही फिरविली होती. त्यामुळे अनेक सर्वसामान्य व्यवसायिकांनी आपली अतिक्रमणे स्वतःहून काढून घेण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान ज्या टपरीधारक व्यवसायिकांचे अतिक्रमण हटवण्यात येणार आहे त्या व्यवसायिकांना पालिकेने व्यवसायासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत आहे. मात्र तो फार्स आहे की वस्तुस्थिती? हे मात्र गुलदस्त्यातच राहिल्याचे दिसते. तर दुसरीकडे अतिक्रमण हटविल्यामुळे शहराचा श्वास मोकळा होणार असून वाहतुकीस होणारा अडथळा दूर होण्यास मदत होईल अशी प्रतिक्रिया सुजाण नागरिकांनी व्यक्त करत आहेत.
आजी व माजी आमदारांची प्रतिष्ठा मात्र पणाला लागत असल्याने सर्व सामान्य नागरिक मोठ्या आशेने या विषयाकडे पहात आहेत.
आमदार बबनराव पाचपुते यांनी ही ‘माऊली’ विषयी पुर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याचे समजते. तर दुसरीकडे मा.आमदार राहुल जगताप यांनी कार्यकर्त्यांकरवी स्वत:च्या कार्यालयाचे अतिक्रमण काढण्याचे सुचना केल्या असल्याचे पहावयास मिळत आहे.
श्रीगोंदा शहरातील काही ओपन स्पेस वरती अतिक्रमण असुन पालिका त्यावर ही कारवाई करणार का? याकडे श्रीगोंदा तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
परंतु महत्वाचा मुद्दा असा कि, आजी व माजी दोनही आमदार साहेबांनी आपली नजरचुकीने झालेले अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया सुरु केली. मात्र दुसरीकडे वडाळी रोडवर असलेले अमृततुल्य व मेडिकल नेमके कुणाची वाट पहात होते? हे मात्र समजण्याच्या पलीकडचे असल्याचे नागरिक उघडपणे बोलत आहेत. यांनी स्वत: पुढे होऊन आपले अतिक्रमण का काढले नाही? यामागे हेतु काय असावा ? कोण आहे पाठीराखा ? जो अशा लोकांच्या पाठीशी उभा राहतो ? हे शोधण्याची गरज असल्याचे जाणवते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here