अघोषित शिक्षक महासंघाचे समन्वयक म्हणून कामगिरी बजावलेले प्रा.नवनाथ गाडे सर वाढदिवस विशेष.

अघोषित शिक्षक महासंघाचे समन्वयक म्हणून कामगिरी बजावलेले व सध्या इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ ,
श्री .नारायणदास रामदास हायस्कूल व जुनिअर कॉलेज इंदापूर मध्ये अध्यापन करत असलेले प्राध्यापक नवनाथ गाडे सर यांचा आज वाढदिवस….खरंतर हे व्यक्तिमत्त्व कोणत्याही चार शब्दांमध्ये व्यक्त करावं इतपत छोटं नाही…ज्या व्यक्तीने पुणे विद्यापीठातून २००७ साली मराठी सारख्या विषयातून एम. ए . पदवी प्राप्त केली. २००८ साली बी.एड. पदवी मिळवली.हेच करत असताना ते नेट परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर २००८ साली हुतात्मा राजगुरू महाविद्यालय राजगुरुनगर व २०१० पासून ते आजतागायत इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेत ते अध्यापन करत आहेत. ऑक्टोबर २०२२ मध्ये अघोषित शिक्षक संघामध्ये ते आझाद मैदान मुंबई येथे दिवाळी सुट्टीत आले. त्या ठिकाणी त्यांनी आपुलकीने एकमेकांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका बजावली. खरे पाहता लहानपणापासून घरात आध्यात्मिक वारसा असल्याने त्यांची जडणघडण ही सर्वसमावेशक बनलेली . एखाद्या हरिभक्त पारायणकारास शोभेल असे अभंग,पदं, सुवचने त्यांची मुखोदगत आहेत. गाडे सर हे खूप हलाखीची परिस्थितीतून पुढे आलेले असल्याने महाराष्ट्रातील अघोषितांना न्याय मिळवून देण्यासाठी ते खूप धडपडले व शेवटी ते यशस्वी ठरले. रात्री 12 तर कधी 1 वाजेपर्यंत मिटींग असायच्या. उद्या काय रणनिती आखल्यास यश मिळेल. हे ठरवावे लागत होते. शिक्षणक्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्रांमध्ये पवित्र ज्ञानदानाचे काम करणाऱ्या शिक्षकाला किती झुंजावे लागले. हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. इतपत उत्तुंग यश मिळवून देण्याची क्षमता असणारे व्यक्तिमत्त्व हे इंदापुरच्या भूमीपुत्राचे महत्त्वपूर्ण योगदानच सांगते. १०ऑक्टोंबर २०२२ रोजी आझाद मैदानातील त्यांची उपस्थिती सर्वच शिक्षकांनी हेरली. त्यांच्या पहिल्याच भेटीमध्ये अनेकांनी त्यांच्याशी मैत्रीचं नातं जोडलं. कारण प्रश्नच गंभीर होता. अघोषित शिक्षकांच्या प्रश्नांची अचूक जाण असणारे व्यक्तिमत्व म्हणजेच गाडे सर होय .. त्यांचा विषय जरी मराठी असला तरी ते काम मात्र विज्ञान विभागामध्ये करतात. खरंच ही अभिमानास्पद गोष्ट आहे. ज्या ज्या वेळेला अघोषित शिक्षक महासंघाचे शिष्टमंडळ मंत्री महोदय आदरणीय दिपकजी केसरकार यांना भेटण्यास गेलं तेव्हा तेव्हा सरांचा सहभाग हा लक्षवेधी ठरला. पाठपुरावा करत असताना कधीही त्या व्यक्तीने मी हे सर्व करतोय असं कधी दाखवून दिलं नाही. तर आपण सर्वजण हे करतोय असंच म्हणायचे. एखाद्या व्यक्तीच्या योगदानावरून त्याची योग्यता ही ठरत असते. ज्ञानाचा जो उदय तो खऱ्या अर्थाने समर्पित भावनेतूनच होत असतो. त्या ठिकाणी पसायदान, हरे राम हरे राम राम राम हरे हरे चा जय घोष करत करत असताना त्यांना हे यश मिळाले असे अघोषित शिक्षक सांगतात. त्यांनी संयमित भावनेतून, सनदशीर मार्गाने 18 ते 20 वर्षांच्या प्रलंबित शिक्षकांच्या अनुदानाच्या विषयासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली.रात्री कधी उपाशीपोटी सुद्धा झोपावं लागलं. तरी ते हिंमत हरले नाहीत.असा जिगरबाज शिक्षक म्हणजे गाडे सरच आहेत असे आझाद मैदानातील शिक्षक सांगतात. अशी भावना त्यांची प्रत्येक ठिकाणी होती.आझाद मैदानावरती असताना असो किंवा मंत्रालयातील पाठपुरावा करत असताना असो.याचा परिपाक म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री वित्तमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर साहेब यांनी विनाअनुदानित शिक्षकांना घोषित करण्यासाठी व विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी ११६० कोटींचा निधी मंजूर केला. १८ ते २० वर्षांचा शिक्षकांचा प्रलंबित प्रश्न कायमचा सोडवण्याची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे साठ हजार शिक्षकांना न्याय मिळणार आहे.
तळागाळातील सर्वसामान्य शिक्षकांना घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका त्यांनी पार पाडली. विशेष म्हणजे संस्थेचे अध्यक्ष मा.हर्षवर्धनजी पाटील साहेबांच्या कॉलेजमध्ये काम करणारे म्हटल्यावर अनेकांच्या अपेक्षा वाढायच्या त्या सरांच्या माध्यमातून पूर्ण झाल्याचे शिक्षक सांगत आहेत.
आज राष्ट्रमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस . गाडे सरांच्या वाणीला व कार्यकर्तृत्वाला सलाम करेल तेवढा कमीच! सर्वसामान्य माणसाला शिक्षकाला सोबत घेऊन जाणारी कला माणसाला महान बनविते. जनता एक्सप्रेस मराठी न्यूज कडून प्राध्यापक नवनाथ गाडे सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here