थेऊर फाटा: अनेक दिवसांपासून सतत होणाऱ्या अपघातांमुळे कायम चर्चेत राहिलेल्या थेऊर फाटा उड्डाणपुला वर रिफ्लेक्टर बसविण्याची मागणी सातत्याने वाहनचालकांकडून होत होती.. शासकीय लालफितीच्या कारभाराने रिफ्लेक्टर बसविण्यात होत आलेल्या दिरंगाईमुळे उड्डाणपुलावरील अपघाताची मालिका सुरूच होती.. वृत्तपत्रात याबाबत आलेल्या बातमीची दखल घेऊन, छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून, व्हिलेजर्स फाऊंडेशन व हवेली तालुका शिवसेना यांनी पुढाकार घेत स्वखर्चाने रिफ्लेक्टर बसवून दिले.. लोणी काळभोर वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक मा. श्री. अशोक शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.. या रिफ्लेक्टरचे उदघाटन लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मा. श्री. गोरे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.. यावेळी हवेली तालुका शिवसेना प्रमुख श्री. प्रशांत काळभोर, व्हिलेजर्स फाऊंडेशनचे श्री. राजेश काळभोर सर, कुंजीरवाडीचे माजी सरपंच श्री. सचिन तुपे व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.. रस्त्यावर होणाऱ्या अपघाताने फक्त अपघातग्रस्त व्यक्तीच नाही तर त्याच्यावर अवलंबून असणारे संपूर्ण कुटुंबही जायबंदी होत असते.. त्यामुळे अशा वेदनांपासून सर्वसामान्यांना वाचवण्यासाठी व सुरक्षित वाहतुकीसाठी सदर रिफ्लेक्टर हवेली तालुका शिवसेना व व्हिलेजर्स फाऊंडेशनच्या वतीने बसविण्यात आल्याची माहिती श्री. राजेश काळभोर सर यांनी दिली.. यावेळी पत्रकार बांधव तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.. हवेली तालुका शिवसेना व संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने व्हिलेजर्स फाउंडेशन ने हा उपक्रम आयोजित केला होता. लोकहिताच्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे..