आटपाडी: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर अडचणीत सापडण्याची माहिती समोर आली आहे. गोपीचंद आणि त्यांच्या भावावर ऍट्रॉसिटी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. आटपाडी मधील झरे येथील शेतकरी महादेव अण्णा वाघमारे (वय – ७७) असे फिर्यादी शेतकऱ्याचे नाव आहे. वाघमारे यांनी त्यांची जमीन विकण्यासाठी काढली, ती जमीन घेण्यासाठी पडळकर यांनी सहमती दर्शविली. जमीन घेण्या वेळेस त्यांनी १ लाख ६० हजार रुपये रोख दिले. जमिनीचा व्यवहार ६ लाख २० हजार प्रमाणे ठरला होता. राहिलेले पैसे ४ लाख ६० हजार परत देतो म्हणून दिले नाहीत. अनेकवेळा मागितले मात्र दिले असल्यामुळे वाघमारे यांना संशय आला. त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, पडळकर बंधूंनी आपली फसवणूक केली आहे. वाघमारे यांनी थेट आटपाडी पोलिस स्टेशन गाठून गोपीचंद पडळकर आणि ब्रह्मदेव पडळकर यांच्या विरोधात तक्रार दिली आहे.पोलिसांनी सदर फिर्याद दाखल केली आहे, ऍट्रॉसिटीसह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पडळकर यांना अटक होणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.