अखेर ओमान समुद्र दुर्घटनेत बुडालेले सांगलीकरांचे दोन मृत्यूदेह सापडले.

सांगली : गेल्या दोन दिवसांपासून ओमान समुद्र किनारी लाटांसोबत वाहून गेलेल्या काही जणांचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे. ओमानच्या समुद्र किनारी रविवारी घडलेल्या घटनेचा हा व्हिडीओ आहे.यात बेपत्ता झालेले तिघे हे मूळचे सांगली जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले असून, यातील बुडालेल्या दोघांचे मृतदेह सापडले आहेत.
जतमधील वकील राजकुमार म्हमाणे यांचे मोठे भाऊ शशिकांत म्हमाणे आणि त्यांची दोन मुले, श्रेयस आणि मुलगी श्रेया समुद्र किनारी फिरायला गेले होते. परंतु, जोरदार लाटेत ते वाहून गेले होते. ओमान पोलिसांनी शशिकांत म्हमाणे आणि त्यांचा मुलगा श्रेयस याचा मृतदेह शोधून काढला होता, पण मुलगी श्रेया तसेच वाहून गेलेल्या आणखी दोघांचे मृतदेह अद्याप सापडले नाही. रविवारी ही घटना घडली असून, त्यांच्या नातेवाईकांनी बुडालेल्या व्यक्तींचा शोध सुरू असल्याचे सांगितले आहे. दुबईतील इंटरनॅशनल कंपनीत शशिकांत म्हमाणे हे अभियंता आहेत. शशिकांत हे पत्नी सारिका, मुलगा श्रेयस आणि दोन मुलींसह राहायला आहेत. ईदच्या सुट्टीनिमित्त म्हमाणे कुटुंबीय मित्र मंडळींसह ओमानमध्ये फिरायला गेले होते.ओमानच्या अल्मुगसयाल समुद्र किनार्‍यावर म्हमाणे कुटुंबीय लाटांचा आनंद घेत होते. त्यावेळी मागून आलेल्या मोठ्या लाटांच्या तडाक्यात मुलगी आणि मुलगा वाहून जात असताना शशिकांत यांना दिसले. तेव्हा दोघांनाही वाचवण्यासाठी गेलेले शशिकांतसुद्धा समुद्रात बुडाले. यांचा हा व्हिडीओ समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here