इंदापूर: बरेच दिवस अवसरी गावासाठी आरोग्य सेवक म्हणून डॉक्टर चोरमले यांनी काम केले होते ,पण गेले काही दिवसात त्यांचे प्रमोशन झाल्यामुळे ते दुसऱ्या गावी गेले, त्यामुळे बावडा उपकेंद्र सुरवड मधील अवसरी या गावात नंतर काही दिवस आरोग्य सेवक कोणी नव्हते ,आरोग्य सेविका म्हणून बुधावले मॅडम हेच काम पाहत होत्या ,त्यांच्या बरोबरीने काम करण्यासाठी आरोग्य सेवक नव्हते, त्यामुळे त्यांच्यावर खूप कामाचा ताण पडत होता ,पण आत्ता अवसरी साठी आरोग्य सेवक म्हणून इंदापूर तालुक्यातील कौठळी या गावातील बाबासाहेब भगवान मोरे यांची नियुक्ती झाली आहे. बाबासाहेब मोरे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून हे उद्दिष्ट गाठले आहे. मोरे हे गेले काही दिवस कौठळी ग्रामपंचायत येथे क्लार्क म्हणून काम करत होते. पण जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी आरोग्य सेवक होण्यापर्यंत मजल मारली आहे. बाबासाहेब मोरे हे एकदम गरीब घराण्यातील, त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना मोलमजुरी करून शिक्षणाचे धडे दिले ,आणि त्यांनीही त्याची जाण राखून चिकाटीने व जिद्दीने शिक्षण घेऊन आरोग्य सेवक या पदापर्यंत आता ते आले आहेत. त्यांची आरोग्य सेवक या पदावर नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच ते अवसरी मध्ये आज आले होते .अवसरी तील ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला. या सत्कार समारंभासाठी कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक शांतीलाल शिंदे, डॉक्टर नागेश शिंदे , अवसरी ग्रामपंचायत सदस्य आदित्य शिंदे, पत्रकार अंगद तावरे घळके सर, अवसरी ग्रामपंचायत मधील सेवक नितीन कांबळे, डॉक्टर बुधावले मॅडम , आशा सेविका अर्चना माने, व अवसरी मधील बहुसंख्य लोक उपस्थित होते सत्कार समारंभ झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब मोरे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज शी बोलताना म्हणाले प्रथम माझा सत्कार सर्व गावकऱ्यांनी केला, त्यामुळे मी सर्वांना धन्यवाद देतो . माझ्या हातून आपल्यासाठी चांगली सेवा देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल.