दौंड तालुका प्रतिनिधी:गणेश खारतुडे
यवत:अखिल भारतीय मराठा महासंघ आयोजित तसेच भवानीशंकर सोशल फाउंडेशन,पोलीस फ्रेंड वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्री क्षेत्र भुलेश्वर येथे प्रथम श्रावण सोमवार निमित्ताने अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आलेल्या भाविकांना 400 तुळशीच्या रोपांचे वाटप आज करण्यात आले.
हिंदू धर्मामध्ये,वारकरी संप्रदायात तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, तसेच धार्मिकते बरोबर आरोग्यामध्ये सुधा तुळस अग्रस्थानी मानले जाते, याच उद्देशाने श्री क्षेत्र भुलेश्वर येथे आज तुळशी रोपांचे वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे संयोजन आणि उपस्थिती मध्ये पुणे जिल्हा मराठा महासंघाचे अध्यक्ष प्रशांत नाना वांढेकर, जिल्हा युवक अध्यक्ष मयूर आबा सोळसकर, जिल्हा शेतकरी मराठा महासंघ अध्यक्ष विशाल कुंजीर, दौंड तालुका व्यापार उद्योग आघाडी अध्यक्ष सुरज चोरगे, दौंड तालुका वकील आघाडी अध्यक्ष अजित दोरगे, हवेली तालुका मराठा महासंघ अध्यक्ष अतुल मोरे,दौंड तालुका शेतकरी मराठा महासंघ अध्यक्ष विशाल राजवडे, दौंड तालुका विद्यार्थी आघाडी अध्यक्ष समीर लोहकरे, दौंड तालुका मराठा महासंघ अध्यक्ष दिनेश गायकवाड, शेतकरी मराठा महासंघ उपाध्यक्ष विकास टेमगिरे, दौंड तालुका विद्यार्थी सचिव सुरज आखाडे, दौंड तालुका उपाध्यक्ष रोहित कांबळे,दौंड तालुका विद्यार्थी उपाध्यक्ष अशोक आप्पा दळवी, हवेली तालुका शेतकरी मराठा महासंघ अध्यक्ष कुंदन कुंजीर, जालिंदर मगरे,तिलोकचंद भीमरोड आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाला तुळशी रोपांची सौजन्य – सुरज चोरगे अध्यक्ष व्यापार-उद्योग आघाडी मराठा महासंघ दौंड तालुका, व एडवोकेट अजित दोरगे अध्यक्ष वकील आघाडी दौंड तालुका मराठा महासंघ यांनी दिले.
प्रत्येक श्रावणी सोमवारी गेल्या पाच ते सहा वर्षांपासून विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. या वर्षीसुद्धा चारही सोमवारी विविध उपक्रमाचे आयोजन केले जाणार आहे असे यावेळी युवक जिल्हाध्यक्ष मयूर सोळसकर यांनी सांगितले.