अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कार्य उल्लेखनीय! ग्राहकांनी जागृत होणे ही काळाची गरज- तहसीलदार श्रीकांत पाटील.

इंदापूर:दैनंदिन खरेदी करताना ग्राहकांनी अखंड सावधानता बाळगत जागृत राहणे ही काळाची गरज असल्याचे मत इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी व्यक्त केले.अखिल भारतीय ग्राहक पंचायत व अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त कार्यक्रमात तहसीलदार श्रीकांत पाटील बोलत होते.पुढे बोलताना तहसीलदार म्हणाले की पोलीस पाटलांनी हा कायदा समजून घ्यावा गावात काम करत असताना सामान्य शेतकऱ्याला काही अडचण आल्यास या कायद्याद्वारे ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करावे.सध्या तालुक्यात पोट खराब जमिनीचे सातबारा वरील दुरुस्तीचे काम चालू आहे. हे संपूर्ण काम झाल्यानंतर शेतकऱ्यांना याचा फायदा होईल.ग्राहक पंचायतीचे कार्य हे निस्वार्थ भावनेने चालू आहे.हे काम समाज शरणवृत्तीने पुढे चालू ठेवावे. असे त्यांनी सांगितले.सर्जेराव जाधव यांनी ग्राहक कायद्याची उत्पत्ती व गरज या विषयी मार्गदर्शन केले.यावेळी ग्राहक पंचायतीचे पुणे जिल्हा अध्यक्ष दिलीप निंबाळकर यांनी ग्राहकांना फसवणूक होऊच नये यासाठी ग्राहक संरक्षण कायद्याविषयी माहिती दिली. ग्राहक पंचायतीच्या कार्यात लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग द्यावा.ही संघटना राजकारण विरहीत असुन या संघटनेच्या माध्यमातून सामान्य ग्राहकांना न्याय देण्यासाठी उपयोग करावा. तसेच सामान्य ग्राहकाची फसवणूक झाल्यास त्यांनी, 70 38 80 22 02 व 88 88 83 23 16 या भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याचे आवाहनही केले.यावेळी जनार्दन पंढरमिशे, दिलावर तांबोळी यांनी वेगवेगळ्या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले.कृषी विभागाच्या वतीने महानवर साहेब यांनी शेतीच्या योजना विषयी माहिती दिली.कार्यक्रमाचे प्रस्ताविक ग्राहक पंचायतीचे इंदापूर तालुका अध्यक्ष किशोर भोईटे यांनी केले.आभार आरोग्य समिती प्रमुख शत्रुघ्न घाडगे यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन पुरवठा विभागाचे निरीक्षक अनगरे साहेब, दीपक पवार यांनी केले. यावेळी तालुक्यातील सर्व विभागांचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी पोलीस पाटील, रेशनिंग दुकानदार यांच्यासह ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here