अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्या शासन दरबारी मांडण्यासाठी तुमचा हा मामा खंबीर- आ. दत्तात्रय भरणे.

आज नागपूर येथे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी महामोर्चाचे आयोजन केले होते.यानिमित्ताने माजी राज्यमंत्री मा.दत्तात्रय (मामा) भरणे यांनी महामोर्चामध्ये सहभागी होत अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांना पाठिंबा दर्शविला आहे.या महामोर्चास संबोधित करताना श्री.भरणे म्हणाले की,आमच्या अंगणवाडी सेविका अतिशय तुटपुंज्या मानधनामध्ये वर्षानुवर्षे नोकरी करत आहेत.आजच्या वाढत्या महागाईमुळे तसेच इतर कारणांमुळे त्यांना अनेक स्वरूपाच्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे,हि वस्तुस्थिती आहे.त्यामुळे अंगणवाडी सेविकांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला पाहिजे तसेच आमच्या भगिनींच्या ज्या काही मागण्या आहेत, त्या शासनदरबारी मांडून सोडविण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करण्यासाठी तुमचा हा मामा खंबीर आहे असा विश्वास यावेळी मामांनी दिला.या मोर्चास आ. नितीन पवार, आ. इंद्रनील नाईक यांच्यासह मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका भगिनी उपस्थित होत्या.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here