इंदापूर शहर हे सध्या झपाट्याने वाढत असून या शहरामध्ये सर्वात मोठी समस्या ही पार्किंगची आहे. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये शाळा,कॉलेज,नगरपालिका, पंचायत समिती, एसटी स्टँड, कोर्ट असल्याने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी राहते.इंदापूर शहरातील कायम चर्चेत असणारा विषय म्हणजे रस्त्याच्या दुतर्फा उभ्या केलेल्या दुचाकी व चार चाकी वाहनांची प्रचंड गर्दी व या गर्दीतुन जीव मुठीत घेऊन वाट काढणारे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी.
रस्त्याने भरधाव वेगाने ऊस वाहतुक करणारी वाहने यामुळे इंदापूर शहरातील नागरिक, शालेय विदयार्थी यांच्या जीवितास मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला असुन या समस्येबाबत संबंधित प्रशासनाने त्वरित याकडे लक्ष द्यावे. त्याचप्रमाणे अवजड वाहनांना शहरातून वाहतुकीसाठी परवानगी नाकरावी या सर्व कारणांसाठी आज जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांनी पोलीस प्रशासनाशी स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन संवाद साधला होता व या संदर्भात त्वरित उपाययोजना कराव्यात अशी त्यांनी विनंती केली होती.काल शनिवारी दुपारी साडेबारा वाजता इंदापूर शहरातील जुना पुणे सोलापूर हायवे रोड,आय. कॉलेज समोर एका निष्पाप व कोवळ्या जीवाला आपल्या प्राणास मुकावे लागले होते.भविष्यात अशा प्रकारचा अपघात होऊ नये म्हणून खबरदारी घ्यावी व वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी असे निवेदन पोलीस प्रशासनाला अंकिता पाटील ठाकरे यांनी दिले होते.यालाच अनुसरून आज रविवार दिनांक ११ डिसेंबर रोजी शहरातील जुना पुणे-सोलापूर हायवे रोडवरील बेशिस्त पार्किंगवर कडक कारवाईचा बडगा उगारत पोलीस कारवाई करण्यात आली.यापूर्वी नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग,तहसिल व पोलीस प्रशासन यांना वारंवार लेखी निवेदन सामाजिक कार्यकर्ते, व दक्ष नागरीक यांनी दिले होते लोकशाहीच्या चौथ्या स्तंभामार्फत इंदापूरचे पत्रकार समीर सय्यद यांनीही सोशल मीडिया मार्फत पार्किंग व बेशिस्त वाहतुकीमुळे अपघात होऊ शकतात याची प्रशासनाने दखल घ्यावी असे वारंवार लेखणीच्या मार्फत मांडणी केली होती.परंतु या बाबत सर्वांची घोर निराशा होत होती.आज आठवडे बाजार दिवशीच पोलीस निरीक्षक टि. वाय. मुजावर यांनी अशा बेशिस्त वाहनांवर धडक कारवाई केली. या बेशिस्त वाहन धारकांचे वाहन चालविण्याचा परवाना देखील तपासण्यात आला. या धडक कारवाईमुळे वाहन धारकांची पळापळ झाली. धडक कारवाई मुळे बेशिस्त वाहनधारकांमध्ये चांगलीच दहशत बसली.या बेशिस्त वाहनांमुळे अनेक छोटे मोठे अपघात झाले आहेत.आजच्या कारवाई मुळे व्यवसायधारक समाधानी झाले आहेत. अनेक लघु व्यवसायीक यामुळे जाम खुश झाले आहेत. पोलीस निरीक्षक टि. वाय. मुजावर यांचे कौतुक यामुळे होत आहे. यापुढे अशी बेशिस्त वाहने पार्किंग होणार नाहीत याचेही समाधान अनेक व्यवसायीक बोलुन दाखवित आहेत.एकंदरीतच अंकिता पाटील ठाकरे यांनी केलेल्या या महत्वपूर्ण निवेदनास अनुसरून व शहरातील कालच्या अपघातामुळे झालेला जनतेचा रोष पाहता कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मुजावरसो यांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे.आणि याच कारवाईमुळे इंदापूरकरांना मात्र नक्कीच दिलासा मिळत आहे.
Home Uncategorized अंकिता पाटील ठाकरे यांनी दिलेल्या निवेदनानंतर इंदापूर पोलीस प्रशासनाची बेधडक कारवाई सुरू..