इंदापूर: श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट कमिटीच्या कार्यअहवालाचे प्रकाशन पुणे जिल्हा सदस्य मा अंकिता ठाकरे-पाटील यांचे हस्ते इंदापूर येथील निवास्थानी करण्यात आले.या वेळी अंकिता पाटील ठाकरे यांनी शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टचे रक्तदानाच्या क्रांतीत विशेष कार्य करत असल्याबद्दल विशेष कौतुकही केले.रक्तदान हेच महादान असून समाजमध्ये रक्तदानाची जनजागृती होणे आणखी गरजेचे आहे असे मत अंकिता पाटील ठाकरे यांनी या वेळी व्यक्त केले.
महाराष्ट्रामध्ये रक्तदान क्षेत्रामध्ये निस्वार्थ काम करताना ज्या काही अडचणी येतात या अडचणी याविषयी प्रदीर्घ चर्चा झाली.या अडचणीतून कसा मार्ग काढायचा वरही सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली.इंदापूर तालुक्यातील थायलेसेमिया रुग्णांसाठी भविष्यात मदत करण्याचे अंकिता पाटील ठाकरे यांनी यावेळी सांगितले.यावेळी शिवशंभू ट्रस्ट संस्थापक/अध्यक्ष शिवश्री भूषण सुर्वे, सदस्य रोहन जाधव, दिनेश घाडगे, इंदापूर तालुका समन्वयक सागर आवटे, सोमनाथ खाडे तसेच इंदापूर तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष सागर शिंदे इत्यादी उपस्थित होते.