उपसंपादक: निलकंठ भोंग
कोरोना काळानंतर आता गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत आहेत. गणेश मंडळांकडून विविध उपक्रमाने यंदाचा गणेशोत्सव साजरा केला जात आहे. निमगाव केतकी येथील गणराज तरुण मित्र मंडळ जानईमळा या गणेशोत्सव मंडळाने यावर्षीचा गणेशोत्सव विविध उपक्रमाने साजरा करत आहेत.
या मंडळाच्या माध्यमातून रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, डान्स स्पर्धा यासारख्या विविध स्पर्धांचे आयोजन केलेले आहे. त्याचप्रमाणे महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे. मुक्ताई ब्लड बँकेच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ही करण्यात आले होते. यामध्ये १०७ रक्त बाटल्याचे संकलन करण्यात आले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य दादाराम शेंडे, रवी शेंडे, बैजू शेंडे काशिनाथ शेंडे, विजय शेंडे, आजिनाथ शेंडे, प्रवीण शेंडे, सुधीर शेंडे, अमोल शेंडे, रेखा शेंडे, रूपाली शेंडे तसेच मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.