इंदापूर: काही अनेक दिवसापासून इंदापूर पोलिस स्टेशन चांगल्या कामकाजने चर्चेचा विषय आहे. पोलीस निरीक्षक टि.वाय. मुजावर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आत्तापर्यंत सर्व गुन्हे कमी झालेली आकडेवारी समोर आलेली आहे त्यातच इंदापूर पोलिसांनी पुन्हा एकदा तब्बल २२ लाख २७ हजार ५०० रुपये किंमतीचा अवैद्य गुटखा सह ४७,२७,५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून तब्बल एका महिन्यात दुसऱ्यांदा अवैद्य गुटख्यावर मोठी कारवाई केली आहे.
सविस्तर माहिती अशी की दि. (०९) जानेवारी रोजी इंदापूर शहरानजीक असलेल्या पायल सर्कल जवळ आयशर कंपनीचा कंटेनर व ऊसाने भरलेला ट्रॅक्टर यांचा अपघात झाला होता. या अपघाता वेळी आयशर कंपनी च्या कंटेनरचा चालक “हनीफ सय्यद”, राहणार -बेंगलोर, हा रस्त्याने वाहन चालवताना सर्व नियमांकडे दुर्लक्ष करून वेगाने चालवत होता.त्यामुळेच त्याने वेगाने चालवलेल्या कंटेनर ने उसाने भरलेल्या ट्रॉलीला पाठीमाघून जोरदार धडक दिली होती.
यामध्ये कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला असतानाही गंभीर जखमी झाला आहे असा बनाव करून चालक पुढील उपचारासाठी पुणे येथे दाखल झाला होता. परंतु दोन ते तीन दिवस सदर कंटेनर कडे कोणीही न फिरकल्याने इंदापूर पोलिसांना वाहनात असलेल्या माला विषयी संशय आल्याने कंटेनरचे पाठीमागील सील तोडून पाहिले असता यामध्ये २२ लाख २७ हजार ५०० रुपये किमतचा अवैधरीत्या गुटखा आढळून आला असून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेला व मानवी आरोग्यास अपायकारक असलेला गुटका वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई मध्ये कंटेनर (केए-०१,एएफ३३९६) मध्ये २२ लाख २७ हजार ५०० रुपये किमतीच्या गुटख्याची ४५ प्लास्टिकची व ६ पिशव्या तसेच प्रत्येक पिशवीत ५५ पॅकबंद पुढे आढळले असून यामध्ये आर के प्रीमियम कंपनी च्या गुटख्याच्या ७५ पुड्या सापडल्या आहेत. तसेच कंटेनरची एकूण किंमत २५ लाख रुपये असून एकूण ४७,२७,५०० रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक टि.वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माने करत आहेत.सदर कारवाई मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक धनवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील, पोलीस उपनिरीक्षक देठे, पोलीस उपनिरीक्षक लिगाडे,पोलीस उपनिरीक्षक पाडुळे, पोलीस उपनिरीक्षक जाधव, पोलीस नाईक सलमान खान, पोलीस हवालदार बालगुडे, पोलीस नाईक ज्ञानेश्वर जाधव, पोलीस शिपाई नरळे, पोलीस नाईक मल्हारे, पोलीस नाईक मनोज गायकवाड, पोलीस नाईक साळवे, पोलीस शिपाई केसकर, पोलीस शिपाई चौधर, पोलीस नाईक अरणे, पोलीस शिपाई शिंगाडे, पोलीस नाईक मामा चौधर, महिला पोलिस हवालदार खंडागळे यांनी सहभाग घेतला होता.
पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर येताच कारवाईचा बडगा….
पोलीस निरीक्षक टीवाय मुजावर इंदापूर पोलीस स्टेशनला रुजू झाल्यापासून अनेक मोठ्या कारवाया करण्यात आल्या असून अवैद्य धंदे व अवैद्य मालाची वाहतूक करणाऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. तसेच तब्बल एक ते दीड महिन्याच्या अंतरात अवैद्य गुटख्यावर ती दोन मोठ्या कारवाया करण्यात आल्या असून लाखो रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.