📽️ नागराज मंजुळे यांची कोरोनावर आधारित शॉर्ट फिल्म ‘वैकुंठ” लवकरच. प्रेक्षकांत उत्कंठा शिगेला.

जेऊर -(दि. 18) जेऊर चे सुपुत्र आणि सैराट- फँड्रीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची नवीन शॉर्ट फिल्म लवकरच सर्वांच्या भेटीला येत असून येत्या शुक्रवारी दिनांक 21 जानेवारीला ॲमेझॉन प्राईम या चॅनलवर पाहता येणार आहे. या शॉर्ट फिल्म चे नाव “वैकुंठ”असुन हि शॉर्ट फिल्म कोरोना वर आधारित आहे.या शॉर्ट फिल्म चे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले असून या शॉर्ट फिल्ममध्ये मुख्य भूमिका नागराज मंजुळे यांचीच आहे .तर लहान मुलाच्या भूमिकेत जेऊर चे राजू करचे यांचा मुलगा अर्जुन करचे असून जेऊर येथील स्वामी विवेकानंद संस्थेचे चेअरमन नागेश झांजुरणे यांचीही या फिल्ममध्ये Entry असणार आहे.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here