भिगवण:शिवम अध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान कराड, बारामती विभाग यांचे वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त भिगवण येथील श्याम गार्डन मंगल कार्यालयाच्या विशाल प्रांगणात ‘स्वर निनाद कोल्हापूर’ यांचा “जागो हिंदुस्थानी” हा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्यामध्ये एका विशिष्ट पद्धतीने शहीद जवानांना आदरांजली अर्पण करण्यात येऊन उपस्थित माजी सैनिकांना मानवंदना देण्यात आली. यात इंदापूर, बारामती, दौंड, करमाळा, कर्जत तालुक्यातील विविध माजी सैनिकांच्या संघटनेतील सुमारे शंभर सैनिक सहभागी झाले होते. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर भिगवणसारख्या शहरात प्रथमच साजरा होणाऱ्या या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाला भिगवण पंचक्रोशीतील जनतेने व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सुद्धा उस्फुर्त प्रतिसाद दिला.
भिगवण शहरातील प्रतिष्ठित अशोकशेठ रायसोनी, शंकरराव गायकवाड, जालिंदरभाऊ ढवळे, साईनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत खानावरे, भिगवण शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अजितनाना क्षीरसागर, विजयकुमार बोगवत, दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक प्रा. रामदास झोळ, महेंद्र शेठ बोगवत, महावीर शेठ कोठारी, डॉ. अजय थोरात, डॉ. मिथुन यादव, डॉ. संजय भोसले, विठ्ठलराव थोरात शिक्षण संस्थेचे संस्थापक बापुरावजी थोरात, कर्मवीर शंकरराव पाटील साखर कारखान्याचे संचालक परागभाऊ जाधव, रियाज शेख, संजय चौधरी, संपत बंडगर, प्रदीप वाकसे, संजय खाडे, प्रवीण वाघ, मनीष शेठ शर्मा, श्रीराम नहाने व सुरेश काळे यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिवमचे बारामती विभाग प्रमुख संदीपदादा काळे, मार्गदर्शक अशोकराव सस्ते, डॉ.जयप्रकाश खरड, डॉ. सौ.पद्मा खरड, सुहासदादा प्रभावळे, स्वामीदादा भिसे, अमोल लंबाते, कैलास कुदळे, प्रवीण काळे, शिवाजी खरे, नितीन काळे, व्हीकीदादा बारटक्के, सौरभ नरुटे, स्वप्नील काळे, सुरेखा काळे, ज्योती लंबाते, वैशाली काळे, वर्षा काळे या शिवमच्या साधकांनी विशेष परिश्रम घेतले.
Home Uncategorized 🇮🇳 ‘शिवम’ने जागविल्या शहिदांच्या स्मृती…भिगवणकरांची भारतीय जवानांना आदरांजली व माजी सैनिकांना मानवंदना.