⏰ राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांचा विकास कामाचा धडाका सुरूच… शुक्रवारी होणार तरंगवाडी आणि गोखळीत विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन.

इंदापूर: इंदापूर तालुक्यामध्ये राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यापासून कोट्यवधी रुपयांच्या विविध विकास कामाचे उद्घाटन व भूमिपूजन करण्याचा धडाका सुरू आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक निधी मिळाल्या पैकी इंदापूर तालुका हा अग्रेसर आहे व याचे संपूर्ण श्रेय राज्यमंत्री दत्ता मामा भरणे यांना जाते.
उद्या धुलीवंदन दिवशी तब्बल 8 कोटी 75 लक्ष रुपयांचे गोखळी व तरंगवाडी पंचक्रोशीतील विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन दत्ता मामा भरणे यांच्या हस्ते होणार असून एक प्रमुख्याने तरंगवाडी गोखळी रस्ता, तरंगवाडी ओढ्यावरील पूल, त्याचप्रमाणे गोखळी मध्ये अद्यावत प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच तरंगवाडी व गोखळी पंचक्रोशी मध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन राज्यमंत्री दत्ता मामा भरणे यांच्या हस्ते होणार आहे.नुकतेच काझड येथील सभेत विज बिलाविषयी दोन दिवसात सकारात्मक निर्णय होईल असे दत्तामामांनी सांगितल्यानंतर अवघ्या दोनच दिवसात वीज तोडीचा निर्णय शासनाने तीन महिन्याकरिता थांबवला होता.इंदापूर तालुक्यातील कानाकोपऱ्यात वाडीवस्ती पर्यंत रस्ते,सभामंडप,आरोग्य सेवा,इत्यादी पोहोचल्या पाहिजेत याच मानसिकतेतून सध्या इंदापूर तालुक्यात जोरदार विकासकामे चालू असल्याचे निदर्शनास येत आहे.आणि यातूनच आजपर्यंत कौठळी,निरवांगी,वालचंदनगर, शहा,चाकाटी,काझड, कुंभारगाव व आता तरंगवाडी आणि गोखळी या सर्व गावांमध्ये व संबंधित पंचक्रोशीमध्ये विविध विकास कामांचे उद्घाटने होत आहेत व सभा सुद्धा जोरदार होत आहे

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here