- बोरी: इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडियाच्या उपाध्यक्षपदी बोरी गावचे राहुल शरद पाटील यांची निवड करण्यात आली.या निवडीचे पत्र आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते देण्यात आले. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील तसेच आमदार दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणे आचार विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवून पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी मी सदैव काम करेन असे राहुल पाटील यांनी यावेळी सांगितले त्याचप्रमाणे जनसामान्यांच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी जास्तीत जास्त समाज विधायक कामे करण्यासाठी मी कायमस्वरूपी कार्यरत राहणार असल्याचे मत नवनिर्वाचित सोशल मीडियाचे उपाध्यक्ष राहुल पाटील यांनी व्यक्त केले.