आज दिनांक.23/8/2023 रोजी सकाळी 11.30 वाजता ॲड. बाळासाहेब चव्हाण वकिलांच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक श्री सोपान नाना पवार यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी इंदापूर शहरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती व वकील उपस्थित होते. ॲड.बाळासाहेब चव्हाण यांनी ॲड. अशोक दादा घोगरे यांच्याकडे कारकुन म्हणून 12 वर्षे काम केले होते,काम करून शिक्षण घेतले, तेव्हा ते वकील झाले. त्यांची वकिलीची 23 वर्ष पूर्ण झाली.दिवाणी आणि फौजदारी स्वरूपाच्या 15000 केसच्या फायली आहेत त्यांचे काम पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नगर, या जिल्ह्यातील तालुका न्यायालयामध्ये प्रसिद्ध वकील म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यातील ,त्यांच्या हातून 14 वकील तयार झालेले आहेत.यावेळी उपस्थित इंदापूर वकील संघटनेचे अध्यक्ष .ॲड.शहा एन,एस. उपाध्यक्ष ॲड.धैर्यशील नलवडे, तसेच ज्येष्ठ वकील श्री. के डी यादव , ॲड.घोगरे दादा,ॲड वाघमोडे, ॲड. नरूटे, ॲड. राकेश शुक्ल , ॲड. अक्रम शेख, सरकारी वकील लोहकरे साहेब ॲड सांगळे,ॲड .वकील संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. इंदापूर कोर्टातील सर्व वकील उपस्थित होते.श्री शिवसृष्टीचे संपादक श्री धनंजय कळमकर पाटील, सामाजिक कार्यकर्ते हमीद भाई आतार, प्रसिद्ध व्यापारी धरमचंद लोढा, संघर्ष समितीचे प्रमुख प्राध्यापक कृष्णा ताटे, संतोष जामदार, सुनील यादव, प्रदीप पवार, भारत बोराटे, बोंगाणे सर, प्रमोद काळे, रफिक सय्यद, अनिकेत शिंदे,युवराज भाऊ पवार, सोमनाथ चव्हाण ,दत्ता चव्हाण, अनिल चव्हाण, लेखक महादेव चव्हाण सर, रुपेश कांबळे, पालखे नितीन, यावेळी असंख्य पक्षकार उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये कार्यालयाची उद्घाटन संपन्न झाले.