इंदापूर .ता .प्रतिनिधी. सचिन शिंदे ,जनता एक्स्प्रेस मराठी न्युज.
निमगाव केतकी: दि २८ श्री केतकेश्वर विद्यालय माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय निमगाव केतकीच्या इयत्ता १० वी सन १९९९ व इयत्ता १२ सन २००१ च्या सर्व विद्यार्थ्यांनी एकञ येत बारामती येथील स्नेहमेळवा विविध उपक्रम घेत संपन्न झाला.या वेळी या दोन्ही बॕचचे विविध भागात कार्यरत असणारे ९० जण सहभागी झाले. मेळाव्याच्या सुरूवातीस राष्ट्रगीत घेवून सर्व मुलींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कोरोनात मृत्यू झालेल्या वर्गमिञ के संतोष काटेकर यांस श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबीयांना ७५ हजार रूपयांची आर्थिक मदत करण्यात आली.त्याचप्रमाणे सर्व मिञांनी पुन्हा एकदा ओळख करून सध्याचा काय करत आहे हे सांगितले. याबॕच मधील डाॕक्टर , इंजीनीअर , वकील , शिक्षक , अधिकारी , सरंपच , ग्रा पं सदस्य , व्यावसायिक , प्रगतशील शेतकरी अशा विविध क्षेत्रात सर्वजण कार्यरत आहेत. अशा यावेळी बालरोग तज्ञ डाॕ समीर मुलाणी , सीए सारंग गुधाटे , सेवानिवृत्त फौजी बापू माने , ॲड श्रीकांत करे , पुणे पोलीस राजू ननवरे , माणिक भोंग , संदिप पवार , संदिप माळी , वैभव जाधव , सावता भोंग , मंगेश भोंग , रश्मी मेहता , प्रभा पाटील , दिनेश पवार यांनी मनोगते व्यक्त केली. सर्वाचे वतीने शाळेतील मुलांना स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी पुस्तके भेट देणार आहेत.यावेळी नाष्टासह जेवणाची सोय करण्यात आली.मेळाव्याचे संयोजन संतोष घनवट , माणिक भोंग , हेमंत भोंग ,रूपाली लामतूरे ,ॲड आशा जाधव यांनी केले. या स्नेहमेळाव्याची आठवण रहावी यासाठी सर्वाना शाळेचे चित्र असलेरा मग भेट देण्यात आला.सुञसंचालन संतोष हेगडे यांनी केले.आभार संतोष गदादे यांनी मानले. https://youtube.com/channel/UCe6MAYmBoaXevmX77q94ulw या लिंकवर क्लिक करून तसेच ताजा घडामोडी साठी जनता एक्सप्रेस मराठी न्यूज ला सबस्क्राईब करा.