१२१ वर्षाची अखंड परंपरा असलेली सत्यनारायणाची महापुजा.

वैभव पाटील: पालघर जिल्हा प्रतिनिधी
सफाळे पश्चिमेला चिखलपाडा हे गाव परिसरात साईबाबाचे गाव म्हणुन नावारुपाला येत असतांनाच आणखी एक नवी अेाळख या गावाने करुन दिली आहे. संपुर्ण आगरी समाजाच्या गावात जवळ जवळ १२१ वर्षापासुन सत्यनारायणाची महापुजा होत आहे. दरवर्षी लक्ष्मीपुजनाच्या दिवशी ही पुजा न चुकता कामगार मंडळी करत असते. करोना सारख्या कठिण काळातसुद्धा ही परंपरा कायम राखली गेली. व गेल्या वर्षीविधवा भगिनिंचा सत्कार करुन १२० वे वर्ष साजरे केले होते.अशी माहिती मंडळाचे हरहुन्नरी कार्यकर्त चिंतामण पाटील व दीपक घरत यांनी दिली. आजतागायत कोणतेही पदाधिकारी नियुक्त नसतांना येथील कामगार मंडळी एकत्र येऊन वर्गणी जमा करुन सर्व खर्च करत असतात. या वेळी गरजु कामगारांना मदत करणे. हुशार विद्यार्थीचा सत्कार करणे.सेवानिवृत्त कामगाराचा सत्कार करणे. गावातिल सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेवुन मदत करणे. विधवा भगिनींचा सन्मान करणे. असे विविध उपक्रम या मंडळीने राबविले आहेत. सोमवार दि.२४.१०.२०२२रोजी संध्या. ७.०० वा. येथील चाैथ्या पिढीने महापुजेचे आयोजन केले होते. या प्रसंगी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणुन राजगुरु ह.म.पंडित विद्यालयाचे उपमुख्याध्यापक राजन घरत उपस्थित होते. ह्या समयी विराथन-चिखलपाडा ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच अंजली किणी तसेच मांडे-विठ्ठलवाडी ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच महेंद्र पाटील व विराथन-चिखलपाडा ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत भोईर सुभाष कदम , घरत यांचा सत्कार करण्यात आला. पुजेच्या निमित्ताने भजनाचा डबल बारी कार्यक्रमह जही करण्यात आला.आजच्या आधुनिक समजल्या काळात ही भजनाचा रसिकांनी भरभरुन आनंद लुटला. सरपंच श्री. महेंद्र पाटील यांनी कामगार मंडळीचे आभार मानून दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निमंत्रित पाहुणे. जगदिश किणी सर यांनीआपल्या खुमासदार शैलीत करुन उपस्थितांची मने जिंकली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here