आज कुर्डूवाडी शहरातील नाभिक समाज बांधवाच्या वतीने कुर्डूवाडी पोलीस स्टेशन मार्फत राज्याचे मुख्यमंञी मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब व ऊपमुख्यमंञी तथा गृहमंञी देंवेद्रजी फडणविस साहेबांना निवेदन पाठवण्यात आले.
सेलु जि.परभणी येथिल नाभिक समाजाच्या १० वर्षाच्या अल्पवयीन मुलीला दोन नराधमांनी बळजबरीने सेलु येथुन उचलुन नेऊन बोरी परिसरात अत्याचार केला आहे.सदर घटनेतील आरोपी हे जिंतूर,मानमोडी तील आहेत,त्यांना पोलिसांनी काल अटक करून दखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.पोलीस चौकशी चालू आहे.
आरोपीना समाधान भद्रगे व उद्धव तूपसुंदर रा.राजेगाव असे पकडलेल्या आरोपीची नावे आहेत.
सदर आरोपीचा हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवुन आरोपींना मरेपर्यंत फाशी मिळावी या साठी शासनाच्या वतीने आपण प्रयत्न करावेत तसेच पिडीत कुटुंबाला शासनाच्या वतीने तातडीची मदत मिळावी.या प्रकरणात सरकारी वकील म्हणुन अॅड.ऊज्जवल निकम यांची नियुक्ती करावी असे निवेदनात म्हणले आहे.हे निवेदन PSI हनुमंत वाघमारे यांना देण्यात आले.या वेळी सुधिर भाऊ गाडेकर,कुमार दळवी,वैजिनाथ राऊत,प्रकाश अवचर,अतुल राऊत,पाडुरंग राऊत,नागन्नाथ ताटे,गजेंद्र राऊत,रामभाऊ राऊत,पोपट गाडेकर आदी समाज बांधव ऊपस्थित होते.
Home कुर्डुवाडी १० वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारविरोधत कुर्डुवाडी शहर नाभिक समाजाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना...