इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू रुग्णांसाठी मोफत सर्वरोग निदान आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख महारुद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महारुद्र पाटील म्हणाले की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं हे सरकार म्हणजे गोरगरिबांचे सरकार आहे गोरगरिबांना केंद्रबिंदू मानून काम करणारे हे सरकार गोरगरिबांच्या आरोग्यावरही लक्ष देत आहे ही खूप विशेष बाब आहे आणि म्हणून आम्ही सुद्धा ग्रामीण भागात आरोग्य सेवा घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न करू व त्याकरिता तालुकास्तरीय शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे स्वतंत्र ऑफिस स्थापन करणार आहे असे बाळासाहेबांची शिवसेनेचे तालुकाप्रमुख महारुद्र पाटील म्हणाले.यावेळी तालुक्यातील शेकडो रुग्णांनी या सर्व रोग निदान शिबिरामध्ये सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.यावेळी बाळासाहेबांची शिवसेना महिला आघाडी पुणे जिल्हा संघटिका सीमा कल्याणकर, वैद्यकीय मदत कक्षाचे भूषण सुर्वे, शहर प्रमुख अशोक देवकर,युवा सेना तालुका अधिकारी अण्णासाहेब काळे, उपतालुका प्रमुख बबन खराडे, महिला आघाडी उपतालुकाप्रमुख ज्योती गाढवे, सागर आवटे, ॲड.आनंद केकान, सोमनाथ लांडगे,अवधूत पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दिपक चोरमले, डॉ. सुहास शेळके डॉ. नामदेव गार्डे त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते.