करमाळा ता. प्रतिनिधी: देवा कदम
करमाळा: सालाबादप्रमाणे हिंगणी येथे शिवशाही फाऊंडेशन व शिवशाही शेतकरी समूह आयोजित शिवजन्मोत्सव २०२२ निमित्ताने समाजप्रबोधनपर किर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच स्वरुप शनिवार दिनांक १९फेब्रुवारी २०२२ सकाळी ९ वा. भैरवनाथ मंदिरासमोर प्रतिमा पुजन होणार आहे व सायंकाळी ७ ते ९ या वेळेत युवा कीर्तनकार, शिवव्याख्याते ह.भ.प प्रकाश महाराज साठे यांचे शिवचरित्रपर समाज प्रबोधन होईल. याचा पंचक्रोशीतील सर्व शिवप्रेमींनी लाभ घ्यावा असे शिवशाही फाऊंडेशन च्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी सरपंच हनुमंत पाटील, कृष्णा बाबर(सहाय्यक पोलीस निरीक्षक, ठाणे),आबासो पाटील(पोलीस पाटील), किरण जाधव(असिस्टंट कामांडन्ट सीमा सुरक्षा बल),भानुदास बाबर (उपसरपंच), संजय बाबर,नवनाथ गायकवाड (सर) सुखदेव धनवडे सर संतोष बाबर (प्राईम ऍग्री एक्स्पोर्ट) उपस्थित राहणार आहेत.