बावडा: शेटफळ हवेली तलाव बचाव समितीच्या मार्फत नुकतेच एक प्रसिद्धी पत्रक तयार केले असून यात शुक्रवार दि 4 मार्च रोजी संवाद यात्रेचे आयोजित केलेली आहे असे समजते. तलावावरील शेटफळ हवेली,सुरवड,वकिलवस्ती,भोडणी,लाखेवाडी,बावडा,पिठेवाडी,निरनिमागव,भगतवाडी, सराटी लाभार्थी शेतक-यांची शासनाच्या जलसंपदा विभागाने अत्यंत अन्यायकारक पद्धतीने सर्व नियम धाब्यावर बसवून शेटफळ तलावातून ६५ शेतक-यांना उचलपाणी परवाना देण्याचा निर्णय घेऊन १० गावातील शेतक-यांच्या पाटचारीणे पाणी मिळण्याच्या हक्कावर १०० वर्षात प्रथमच गदा आणलेली आहे. याची गांर्भीयाने दखल घेतली नाही तर या १० गावांचे ‘वाळवंट’ होण्यास विलंब लागणार नाही.या महत्वपुर्ण विषयावर प्रत्यक्ष शेतक-यांशी संवाद साधण्यासाठी हर्षवर्धन पाटील (माजी संसदीय व सहकार मंत्री) व आप्पासाहेब जगदाळे (संचालक पुणे जिल्हा म.स.बॅक ) यांच्या प्रमुख उपस्थितीत शुकवार दि. ०४/०३/२०२२ रोजी संवाद यात्रा’ आयोजीत केलेली आहे. सदरची संवाद यात्रा खालील वेळेप्रमाणे आयोजित करण्यात आलेली आहे व त्याकरिता शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शेटफळ तलाव बचाव कृती समितीने या प्रसिद्धी पत्रकात म्हणाले आहे.या पत्रकातील “चला तर हिच वेळ आहे,बेकायदेशीर पाणी परवाने रटद करण्याची !! हिच वेळ आहे, अन्यायाला वाचाफोडण्याची!! उठ मर्दा जागा हो, अन्यायाला विरोध कर !!! या ओळी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा उत्साह वाढवत आहेत.