हर्षवर्धन पाटील यांची उपस्थितीत जिल्हा बँकेसाठी आप्पासाहेब जगदाळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल.

इंदापूर: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन 2021 -26 च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी इंदापूर ‘ अ ‘ मतदार संघ तालुका प्रतिनिधी या मतदारसंघातून विद्यमान संचालक आप्पासाहेब नानासाहेब जगदाळे यांनी पुणे येथे सोमवारी ( दि.6) उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित होते.
विद्यमान संचालक असलेले आप्पासाहेब जगदाळे हे गेली वीस वर्ष इंदापूर तालुका सोसायटी अ मतदारसंघातून बँकेवर प्रतिनिधित्व करीत आहेत. निवडणूक अधिकारी व जिल्हा उपनिबंधक मिलिंद सोबले यांच्याकडे आप्पासाहेब जगदाळे यांनी हा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. इंदापूर तालुका अ मतदारसंघातून अप्पासाहेब जगदाळे यांचा एकतर्फी विजय निश्चित असल्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here