इंदापुर तालुक्यात भाजपचे 19 ग्रामपंचायतींवर वर्चस्व,आगामी काळातीही सर्वच निवडणुका जिंकून भाजप आपली ताकद दाखवून देईल – शरद जामदार.

इंदापुरात भाजपचे 19 ग्रामपंचायतींवर वर्चस्व – शरद जामदार – भाजपचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध
इंदापूर : प्रतिनिधी दि.20/12/22
इंदापूर तालुक्यात निवडणूक झालेल्या 26 पैकी 19 ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व मिळविले आहे. या निवडणूकीच्या निकालातून भाजपचे इंदापूर तालुक्यावरील निर्विवाद वर्चस्व पुन्हा सिद्ध झाले आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद जामदार यांनी ग्रा.पं. निवडणूक निकालानंतर मंगळवारी (दि.20) दिली.
इंदापूर तालुक्यात भाजपने वर्चस्व मिळविलेल्या ग्रामपंचायतीं पुढीलप्रमाणे 1) पडस्थळ 2) अजोती-सुगाव 3) डाळज नं.- 1, 4) जांब 5) मानकरवाडी 6) डाळज नं.- 2, 7) गंगावळण 8) थोरातवाडी 9) डाळज न.- 3, 10) हिंगणगाव 11) सराटी 12) बेलवाडी 13) बिजवडी 14) रेडणी 15) पिंपरी खुर्द-शिरसोडी 16) म्हसोबावाडी 17) कुरवली 18) लाखेवाडी 19) बोरी.
इंदापूर तालुक्यातील जनता भाजपच्या पाठीमागे असल्याचे मतदारांनी दाखवून दिले आहे. इंदापूरच्या लोकप्रतिनिधीच्या विरोधात जनतेने मतपेटीतून दिलेला स्पष्ट कौल असल्याचे शरद जामदार यांनी सांगितले.या निवडणुकीमध्ये सुमारे 70 टक्के पेक्षा अधिकच्या ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. तसेच या निवडणुकीत विरोधकांकडे असलेल्या अनेक ग्रामपंचायती भाजपने ताब्यात घेतल्या आहेत. भाजपचे गावोगावचे प्रामाणिक व निष्ठावंत कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतक यांनी ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपच्या विजयासाठी अहोरात्र परिश्रम घेतल्याचे शरद जामदार यांनी सांगितले. आगामी काळातील सर्वच निवडणुका जिंकून भाजप आपली ताकद दाखवून देईल असेही शरद जामदार यांनी सांगितले.
_______________________________

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here