18 जुलै 2022 रोजी हरभजन सिंग ने आम आदमी पक्षाकडून राज्यसभेवर खासदारकीची शपथ घेतल्यानंतर सध्या त्याचा महाराष्ट्र दौरा सुरू केल्याची माहिती मिळत आहे. हा दौरा राजकीय नसून पर्यटनाच्या दृष्टीने असल्याचे बोलले जात आहे हरभजन सिंग मे पाटीलवाडा येथे बसून महाराष्ट्रीयन पदार्थावर जामताव मारला आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रीयन पद्धतीने हरभजन सिंग ने पाटावर बसून जेवण केले.
आयपीएलमध्येही तो बराच काळ मुंबई इंडियन्ससोबत होता, यानंतर तो चेन्नई सुपर किंग्स आणि केकेआरकडून खेळला. आयपीएलच्या 163 सामन्यांमध्ये त्याने 150 विकेट घेतल्या आहेत. अशा या महान क्रिकेटरने नाशिक जिल्ह्यात येऊन महाराष्ट्रीयन पद्धतीच्या जेवणावर ताव मारला याचीच चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होती.