निमगाव केतकी: 4 जानेवारी ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे निधन झाले वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला .सिंधुताई यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी गेल्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. महाराष्ट्र सरकार कडून जवळपास अनेक पुरस्कारांनी सन्मान करून यांच्या सामाजिक कार्याची दखल घेतली होती झालेली घटना अतिशय दुःखद घटना असून समाजात या गोष्टीची पोकळी निर्माण झालेली आहे निमगाव केतकी सुवर्णयुग गणेश मंदिरासमोर माईंना श्रद्धांजली वाहण्यात आली .यावेळेस माईच्या सामाजिक कार्याबद्दल व समाजसेवेत या गोष्टींना उजाळा देण्यात आला.
या कार्यक्रमासाठी श्रीकांत करे वकील, राजू भोंग ,संजय चांदणे, संतोष हेगडे ,सुभाष डोईफोडे, किशोर आबा पवार ,तात्यासाहेब वङापुरे ,राजू घाडगे ,शैलेश शेंद्रे ,आबा लामतुरे ,गणेश घाडगे तसेच निमगाव मधील समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.