शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी शिंदे गट स्वतंत्ररित्या स्थापन केल्यानंतर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या स्तरातून शिंदे गटाला पाठिंबा मिळत आहे. भाजपाशी हात मिळवणी करून शिंदे गटाने मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवत उद्धव ठाकरे यांना जबरदस्त धक्का दिला आहे. त्यातच आता ठाकरे घराण्यातील विशेषता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नातू निहार ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पाठिंबा दिल्याचं प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित होत आहे त्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हा घरचा आहेर आहे का? अशीच चर्चा आहे. या पाठिंब्यामुळे नवीन राजकीय भूकंप होतोय का? व त्यातून शिंदे गटास बळ दिले जाते का अशीच चर्चा आहे.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नातू निहार ठाकरे हे अतिशय शांत व हुशार व्यक्तिमत्व समजले जाते ते व्यवसायाने वकीलकी क्षेत्रात असून त्यांचा व्यवसायात चांगलाच जम बसलेला आहेे. आत्तापर्यंत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नातू निहार ठाकरे हे राजकारणापासून अलिप्त होते पण आता मुख्यमंत्री एकनााथ शिंदेे यांची भेट घेऊन पाठिंबा दिल्यानंतर ठाकरे घराण्याचे राजकारणात आणखी समीकरण बदलतात का? याकडेेे सर्वांचे लक्ष असणार आहे.त्यांचे वडील बिंदुमाधव यांचं 1996 मध्ये अपघाती निधन झालेले होते व या निधनाने बाळासाहेब ठाकरे हे खचले होते असे बोलले जाते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे हे निहार ठाकरे यांचे सख्खे काका असून राज ठाकरे हे त्यांचे चुलत काका आहेत म्हणूनच निहार ठाकरे यांनी दिलेल्या शिंदे गटास पाठिंबा हा घरचाच आहेर समजला जातो. निहार ठाकरे हे इंदापूर तालुक्यातील ‘युवारत्न’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांचे पती तथा हर्षवर्धन पाटील यांचे जावई आहेत. निहार ठाकरे यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय का? याची अधिकृत माहिती मिळत जरी नसली तरी शिंदे गटाला स्वतः भेट देऊन पाठिंबा दिला हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी खूप मोठा झटका आहे असे मानले जात आहे.
Home Uncategorized स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे नातू निहार ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा...