स्वतःच्या मुलावर कोयत्याने सापासप वार करून घेतला जीव,क्रूर बापाला ठोकल्या बेड्या.

घरगुती भांडणातून बापाने सावत्र मुलाचा कोयत्याने सपासप वार करुन खून केल्याची घटना पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्‍यातील पारवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशन गुन्हेशोध पथकाने वनविभागाच्या झाडीत लपलेल्या आरोपीला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी याबाबत माहिती दिली. पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपीला अवघ्या तीन तासात अटक केली आहे.

पारवाडी गावचे पोलीस पाटलांनी गावच्या हद्दीत शिपकुले वस्ती येथे कातकरी समाजातील एकाने स्वत:च्या मुलाचा कोयत्याने डोक्यात वार करुन खून केल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक ढवाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासामध्ये आरोपी मारुती साधुराम जाधव हा मजुरीसाठी पारवडी गावचे हद्दीत आला असून त्यांचा सावत्र मुलगा गोपीनाथ मारुती जाधव याच्यासोबत घरगुती कारणावरुन भांडण झाले होते.त्या रागातून आरोपीने मुलाच्या डोक्यात कोयत्याने सपासप वार केला खून करुन पळून गेल्याची माहिती समोर आली.

आरोपीला पकडण्यासाठी गुन्हेशोध पथक आरोपीच्या मागावर पाठवण्यात आले.आरोपी मोबाईल वापरत नसल्याने त्याचा शोध घेणे कठीण होते. तसेच त्याचे कोणी नातेवाईक नसल्याने आरोपीचा फोटो मिळणे अवघड होते. पोलिसांनी घटनास्थळापासून वनविभागाचा 10 ते 15 किमीचा परिसरात पायी चालत आरोपीचा शोध घेतला. झाडीत लपलेल्या आरोपीला पोलिसांनी केवळ तीन तासात बेड्या ठोकल्या.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते, उपविभागिय पोलीस अधिकारी गणेश इंगळे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस कान्स्टेबल राहुल पांढरे, नंदु जाधव, विजय वाघमोडे, विनोद लोखंडे यांच्या पथकाने केली.



 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here