स्मशानभूमी विना करावे लागतात अंत्यसंस्कार. पाठपुरावा करूनही प्रशासन ‘जैसे थे’च.

वैभव पाटील :पालघर जिल्हा प्रतिनिधी: 9850868663
पालघर तालुक्यातील सफाळे रेल्वेच्या पूर्वे भागातील वसरे- विश्रामपूर ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील विश्रामपूर येथील स्मशानभूमी गेल्या दोन वर्षांपासून ओहोळाच्या प्रवाहात वाहून जाऊन अतिशय धोकादायक बनली आहे. त्यामुळे स्मशानभूमीअभावी उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आहे.
विश्रामपूर गावात गेल्या 12 वर्षापुर्वी दोन लाख साठ रुपये खर्च करून स्मशानभूमी बांधण्यात आली होती. मात्र 2020 साली पावसाळ्यात पुराच्या प्रवाहाबरोबर स्मशानभूमीचा काही भाग पाण्यासोबत वाहून गेला आहे. फक्त स्मशानभूमीचा सांगाडा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. पावसाळ्यात चितेवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुठे न्यावे असा प्रश्न विश्रामपूर गावच्या नागरिकांना पडत आहे.
या स्मशानभूमीची दुरवस्था झाली असून काही भाग वाहून अतिशय धोकादायक बनला आहे. कधीही वरील भाग कोसळू मोठी दुर्घटना घडू शकते . यासाठी स्मशानभूमी दुरुस्ती करण्यासाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती स्मशानभूमीसाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र अजून पर्यंत कुठल्याही प्रकारे स्मशानभूमी साठी निधी उपलब्ध नसल्याने स्मशानभूमीअभावी गावकऱ्यांना मरणयातना ‌जिंवंतपणीच सोसावी लागण्याची वेळ आली आहे. या स्मशानभूमीची शासकीय अधिकारी व पदाधिकारी यांनी जागेवर जाऊन पाहणी केली असुन स्मशानभूमी बांधण्यासाठी हालचाली दिसत नाही. स्मशानभूमी व संरक्षण भिंत बांधून द्यावी अशी मागणी ग्रामपंचायत प्रशासन व जिल्हा परिषदकडे ग्रामस्थांनी केली आहे.



गेल्या दोन वर्षांपासून स्मशानभूमी दुरुस्ती करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला असून आश्वासन देण्यात आले आहे. मात्र अजून पर्यंत कुठल्याही प्रकारे निधी उपलब्ध झाला नसुन उघड्यावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत . लशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन स्मशानभूमी दुरुस्ती करुन ग्रामस्थांना न्याय द्यावा.
👉 जितेंद्र पाटील ग्रामस्थ विश्रामपूर



स्मशानभूमीसाठी पाठपुरावा सुरू असून सहा लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र संरक्षण भिंत उभारण्यासाठी निधीची कमतरता भासत असुन फेर प्रस्ताव करून निधी उपलब्ध करण्यात येईल.
👉 जितेंद्र संखे
ग्रामसेवक वसरे- विश्रामपूर



 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here