अंथुर्णे ता. इंदापूर येथे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय, कळंब यांच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रम संस्कार शिबिरामध्ये इंदापूरच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या हिंदी विभाग प्रमुख डॉ.शितल माने -पवार यांनी स्त्रीभृण हत्या लिंग-भाव संवेदनशीलता जाणीव जागृती या विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना डॉ.शितल माने- पवार यांनी महापुरुषांनी समाज सुधारण्यासाठी, स्त्री स्वातंत्र्यासाठी आपले आयुष्य पणाला लावले.स्त्रियांनी कोणत्याही परिस्थितीत संकट समयी खचून न जाता धैर्याने परिस्थितीचा सामना केला पाहिजे. असे प्रतिपादन करीत स्त्री पुरुष भेदभाव संवेदनशीलता जाणीव जागृतीवर विविध उदाहरणांच्या माध्यमातून स्त्रीभ्रूणहत्येच्या विरोधात महत्व पटवून दिले.यावेळी इंदापूर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय विद्यार्थी विकास मंडळाच्या स्वप्नाली गायकवाड,भाग्यश्री डोंगरे,पूजा ननवरे, वृषाली धाकतोडे,निकिता जाधव, ऐश्वर्या सूर्यवंशी, वृषाली सुरवसे, वैशाली वाघमोडे, ऐश्वर्या देशमुख, शुभम क्षिरसागर,अमृता सुपेकर या विद्यार्थ्यांनी महिला सुरक्षा या विषयावरती जाणीव जागृती साठी पथनाट्य सादर केले . एकविसाव्या शतकातील स्त्री सर्व सामर्थ्यानिशी पुरुषांच्याही पुढे गेलेली असतानाही काही बुरसटलेल्या विचारांचे लोक आजही गर्भ परीक्षण करून स्त्रीभ्रूणहत्येचे पातक डोक्यावर घेत आहेत. ही अत्यंत शरमेची आणि निषेधार्थ बाब आहे. यावरच या पथनाट्यातून प्रकाशझोत टाकण्यात आला.
या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.रामचंद्र पाखरे ,प्रा. ज्योत्स्ना गायकवाड , कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विजय केसकर व इतर प्राध्यापक उपस्थित होते. प्रा.डॉ. केसकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोग तातून डॉ. शितल माने- पवार यांचे ज्वलंत विषयावर मनोगत व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद मान ले व विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्य यातून सर्वांनी बोध घ्यावा अशी इच्छा व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार प्रा. नम्रता सपकाळ व सूत्र संचालन प्रा.अभिजीत शिंगाडे यांनी केले.