पडवी, ता. दौंड या गांवचे सेवानिवृत्त माजी सनदी अधिकारी आणि यापूर्वी रायगड जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून पद भूषविलेले मा. श्री. भरत आनंदराव शितोळे (IAS) साहेब यांच्या मातोश्री स्वर्गीय श्रीमती. सरस्वती आनंदराव शितोळे यांचे गेल्यावर्षी वृध्दापकाळाने दुख:द निधन झाले होते, त्यांचा प्रथम पुण्यस्मरण दिनाचा (वर्षश्राद्ध) कार्यक्रम मंगळवार दिनांक – ०९/०८/२०२२ रोजी पडवी येथे पार पडला. या कार्यक्रमासाठी किर्तनकार “ह.भ.प. प्रा. गुलाबराव करंजुले महाराज, पारनेर” यांचे किर्तनाचा कार्यक्रम सकाळी १० ते १२ या वेळेत ठेवणेत आला होता. ब-याच उपस्थित वक्त्यांनी त्यांच्या मातोश्रीच्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमाला , माजी आमदार रमेश आप्पा थोरात , सन २०१९ च्या लोकसभा उमेदवार सौ. कांचन राहुल कुल , दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री. आप्पासाहेब पवार ,दौंड पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि पाटस गांवचे सामाजिक कार्यकर्ते श्री. साहेबराव वाबळे ,दौंड तालुक्यातील आलेगाव येथील स्थानिक आणि ॲन्टीकरप्शन ब्युरो पुणे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) येथील अप्पर पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार सांभाळलेले सेवानिवृत्त माजी सनदी अधिकारी मा. श्री. दिलीपजी कदम (IPS) साहेब , दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे येथील स्थानिक आणि बॅंक ऑफ महाराष्ट्र च्या वरिष्ठ पदांवर काम केलेले सेवानिवृत्त अधिकारी श्री. गिरमकर साहेब ,दौंड तालुक्याचे नविन नेतृत्व आणि आगामी होणाऱ्या २०२४ च्या विधानसभेचे अपक्ष उमेदवार सेवानिवृत्त महसूल अधिकारी श्री. राजेंद्र निवृत्ती म्हस्के उर्फ म्हस्के भाऊसाहेब आणि इतर उपस्थितांनी आपली उपस्थिती दर्शवून श्रध्दांजली वाहणेचा कार्यक्रम पार पाडलेला आहे.