इंदापूर कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचा, वाणिज्य विभागाचा विद्यार्थी, दत्तात्रय रास्ते याने महाराष्ट्र राज्य प्राध्यापक पात्रता परीक्षेत यश संपादन केले असून, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी रास्ते यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्राध्यापक पदासाठी महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा ( सेट ) यासाठी दि. २६ सप्टेंबर २०२१ रोजी परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये दत्तात्रय रास्ते यांनी यश संपादन केले आहे. दत्तात्रय रास्ते हे मूळचे इंदापूर तालुक्यातील माळवाडी नं.२ येथील रहिवासी असून आई, वडील, भाऊ, शेतकरी आहेत.
या यशाबद्दल मला माझे गुरुजनवर्ग व कुटुंबियांनी पाठबळ दिल्याने व खडतर परिश्रम घेतल्याने हे यश मिळाले रास्ते यांनी सांगितले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, उपाध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव मुकुंद शहा, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे, विभाग प्रमुख व शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी, सहकरी मित्र यांनी दत्तात्रय रास्ते यांचे अभिनंदन केले.