“सुप्रियाताई उद्याच्या नियोजित दौऱ्यात “झेंडू बाम” रस्त्यानेही फिरा”- भाजपा तालुकाध्यक्ष ॲड शरद जामदार .

इंदापूर: बारामती लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीची ताकद वाढत चालली असल्याने आता पवारांच्या पायाखालची वाळू सरकत चालली आहे म्हणूनच यांचे इंदापूर तालुक्यात दौरे वाढलेले आहेत असे मत भाजपा इंदापूर तालुक्याचे अध्यक्ष शरद जामदार यांनी व्यक्त केले.उद्या खासदार सुप्रिया सुळे यांचा वडापुरी गटात नियोजित दौरा आहे पण ताई या गटात फिरताना वडापुरी अवसरी हा रस्ता ज्याला गावकऱ्यांनी झेंडू बाम रस्ता असं नाव दिले आहे त्या रस्त्यानेही पण फिरा म्हणजे विकास काय झाला आहे हे तुम्हाला समजेल असे शरद जामदार म्हणाले.गेल्या सहा ते सात वर्षापासून अवसरी वडापुरी रस्ता हा “झेंडू बाम” रस्ता म्हणून ओळखला जातो कारण या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने तेथील नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. शाळकरी मुले, वृद्ध, शेतकरी या सर्वांची आवकजावक या रस्त्याने मोठ्या प्रमाणात आहे. तरीही जाणीवपूर्वक हा रस्ता दुरुस्त केला गेला नाही असा आरोप शरद जामदार यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावर केला.त्यामुळे उद्याच्या नियोजित दौऱ्यामध्ये अवसरीला आल्यानंतर अवसरी-वडापुरी रस्त्याने जावा असा सल्ला ॲड शरद जमदार यांनी खा.सुप्रिया सुळे यांना दिला.आता शरद आमदार यांनी अवसरी वडापुरी रस्त्याने जाण्याचा सल्ला सुप्रियाताई यांना दिल्यानंतर सुप्रियाताई या रस्त्याची पाहणी करणार का? व रस्त्याचे काम त्वरित चालू होऊन पंचक्रोशीतील लोकांना “झेंडू बाम”या रस्त्यापासून दिलासा मिळणार का? हे पाहण्याजोगे ठरेल.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here