दौंड-पाटस दि.18 येथे नुकतीच श्री सिमेंट कंपनी चालू करण्यात आली आहे या कंपनीसाठी कच्चे मटेरियल हे विविध प्रकारचे बाहेरून येत आहे त्यासाठी मोठ मोठ्या गाडयाचा 10,12,14,18 टायर अशा गाड्याचा वापर केला जातो . त्या वाहतुकीसाठी लागणारा रस्ता अरुंद व योग्य नसतानाही वाहतूक होते परिणामी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे . डोळ्यांमध्ये धुळीचे कण जातात व रोज एक घटना घडत आहे त्यामुळे कंपनीने स्वतंत्र मार्ग पाटस कानंगाव शिव चा मार्ग उपलब्ध करावा .त्यामुळे इतर शेतीचाही मार्ग खुला हाईल शेतकऱ्यांच्या हिताचे होईल व गावा बाहेरून अवजड वाहतूक करता येईल असा निर्णय घ्यावा. रहदारीच्या मार्गाचा अवलंब करू नये अशी मागणी स्थानिक नागरिक करित आहे.