साहित्य रत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त सारसबाग पुणे येथील पूर्णाकृती प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सारसबाग पुणे येथील आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे विचार आचार तळागाळात पोचवावेत तसेच देशातील सर्वोच्च अश्या भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावी अशी मागणी केली.यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना दत्तात्रय भरणे म्हणाले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दिड दिवस फक्त शाळेमध्ये जाऊन महाराष्ट्राची ग्रामीण संस्कृती,कला व लोकजीवन आपल्या साहित्याच्या माध्यमातून देशभरातच नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये पोहचवून महाराष्ट्रासह भारत देशाचा नावलौकिक जगभरामध्ये पसरवला अशा महान व्यक्तिमत्त्वाच्या लेखणीचा व कार्यकर्तृत्वाचा कायमस्वरूपी गौरव रहाण्यासाठी भारत सरकारने त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करावा अशी जाहीर मागणी कार्यक्रमाच्या निमित्ताने दत्तात्रय भरणे यांनी करून जयंतीच्या निमित्ताने समस्त मातंग बांधवांना शब्दरूपी शुभेच्छा दिल्या…
यावेळी काॅंग्रेसचे नेते व माजी मंत्री रमेश बागवे,माजी आमदार मोहन जोशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुभाष जगताप,काॅंगेसचे नगरसेवक अविनाश बागवे,आबा बागुल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Home Uncategorized साहित्य रत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे-मा.राज्यमंत्री आमदार...