“सरकारचे धोरण… शेतकऱ्याचे मरण..!” शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांचा पंढरपुरात घणाघात…” झाला कहर पांडुरंगा सावर ” पंढरपुरात शेतकरी संघटनेचा स्वतंत्र ध्वजारोहण साजरा.

देशाचा अमृत महोत्सव साजरा होत आहे पण गेल्या ७५ वर्षात गल्लीपासून दिल्लीपर्यंत ध्वजारोहण होत आहेत. पण शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील त्यावेळी प्रजासत्ताक राज्य निर्माण होईल. ‘शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी’ शेतकरी संघटनेकडून पंढरपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामगीता तत्त्वज्ञान सक्रिय दर्शन मंदिर या ठिकाणी ध्वजारोहण आणि जनजागरण सप्ताहाचा प्रारंभ झाला. यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि भारतीय किसान-सांघ परिसंघ (सिफा) मा.रघुनाथदादा पाटील यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आला.यावेळी ध्वजारोहणास महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली.यामध्ये क्रांतीसिंह नाना पाटील ब्रिगेड महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शिवाजीनाना नांदखिले म्हणाले हे राज्य प्रजेचे नसून ते नेत्यांचे आहे यालाच नेतेसत्ताक राज्य म्हणतात. देशाला लागलेला आत्महत्यांचा कलंक पुसायच्या असतील तर शेतीमालावरची निर्यात बंदी कायमची उठवली पाहिजे.’राज्य कार्यकारणी सदस्य महादेव कोरे म्हणालेत की, ‘शेतकरी संघटनेने मा.रघुनाथदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सरकारी अधिकाऱ्यांना कायद्याने वागायला शिकवले एका हातात चाबुक आणि एक हातात जीआर घेऊन आम्ही बँका,पतसंस्थांना कायद्याने वागायला शिकवलं.’सरकारचे धोरण शेतकऱ्याचे मरण, शेतकऱ्यांना गळफास ठरणाऱ्या घटना दुरुस्त्या रद्द करा, शेतकऱ्यांना बाजारात तंत्रज्ञानाचे स्वतंत्र द्या अशा घोषणा देऊन मा.रघुनाथदादा पाटील यांचे भाषण चालू झाले.सरकारने शेतकऱ्यांना ७५ वर्षे अंधारात ठेवून उद्योगपतींना कच्चा माल स्वस्त, उद्योगपतींना स्वस्त मजूर, त्या मजुरांना खाण्यासाठी स्वस्त शेतीमाल उपलब्ध करून दिला. चुकीच्या धोरणाचा त्रास फक्त शेतकऱ्यांना झाला परिणामी शेतकरी आत्महत्या वाढल्या. उद्योगपतींच्या उत्पादनांना निर्यात बंदी नाही, पण फक्त शेतकऱ्यांच्या शेतीमालाला निर्यात बंदी जर निर्यात बंदी नसती तर शेतकऱ्यांनी सरकारला कर्ज दिले असते. त्यामुळे सरकारचे धोरण शेतकऱ्याचे मरण हे सिद्ध झाले आहे. उत्पादन खर्चावर आधारित शेतीमालाला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. शेती करण्यासाठी लागणाऱ्या सर्व निविष्ठ महाग झाल्यामुळे शेतीमालाला मिळत असलेला कवडीमोल भाव यामुळे शेतकरी कर्जाच्या चक्रामध्ये अडकतो. या कर्जाच्या चक्रव्यूहातून सुटण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेची कास धरली पाहिजे. आपल्याला शेतकरी विरोधी धोरणामुळे आत्महत्या करायला लागते जर ही धोरणे बदलली तर शेतकऱ्यांना बरे दिवस येतील. शेतकरी आत्महत्या थांबवायचे असतील तर शेतीमालावरील निर्यात बंदी, शेतकरी विरोधी असणारे संपूर्ण कायदे यामध्ये आवश्यक वस्तू कायदा, सीलिंगचे कायदे, भूसंपादन कायदे घटनेचे ९वे परिशिष्ट हे रद्द होणे गरजेचे आहे. दिल्लीपासून ग्रामपंचायत पर्यंत आजचा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. स्वातंत्र मिळाल्यापासून आज पर्यंत फक्त झेंडावंदन होत आहे. यामध्ये आपल्या कृषिप्रधान देशाच्या शेतकऱ्याचा एकही प्रश्न सुटण्यासाठी चर्चा होत नाही. रुपयाचे अवमूल्यन दिवसेंदिवस वाढत चालले आहे. बेरोजगारीचा कहर चालला आहे. शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा वाढतच आहे.पण याकडे कोणतेही सरकार लक्ष देत नाही. फक्त मत मिळवण्यापुरते लोकांच्या सारखे बोलून लोकांची मते मिळवून आपल्याला ज्या प्रकारे राज्य पाहिजे तसे राज्य चालवतात. शेतकरी संघटनेकडून पंढरपूर येथून २६ जानेवारी ते २ फेब्रुवारी असा जनजागरण सप्ताह साजरा होत आहे. यामध्ये शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आपापल्या गावात आपापल्या तालुक्यात शेतकऱ्यांना शेतीमालाच्या भावाचा तक्ता समजावून सांगणार आहेत. शेतकरी विरोधी कायदे शेतकऱ्यांना कशाप्रकारे नुकसान काय आहेत याबद्दल जनजागरण होणार आहे. महाराष्ट्रातील दोन साखर कारखान्यामधील अंतराची अट, दुधाचा दर, सोयाबीन, कापूस, बेकायदेशीर पतसंस्था, बँकांच्या वसुल्या, अशा विविध विषयांवर चर्चा विचार मंथन आणि मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेड अध्यक्ष शिवाजी नांदखिले, राज्य कार्यकारणी सदस्य महादेव कोरे, शेतकरी संघटना सचिव बाळासाहेब वाळके, सचिन कोथमिरे (युवक आघाडी अध्यक्ष इंदापूर तालुका) ,ज्येष्ठ नेते गुलाबराव फलफले, तुकाराम निंबाळकर (उपाध्यक्ष शेतकरी संघटना इंदापूर तालुका ),सोलापूर जिल्हा अध्यक्ष रामभाऊ सारवडे, सांगली जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पाटील, पुणे जिल्हा अध्यक्ष वस्ताद दौंडकर, पश्चिम महाराष्ट्र युवा आघाडी अध्यक्ष हणमंत वीर, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पांडुरंग मारवाडकर, युवा आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष प्रतिक कुलकर्णी, ग्रामगीता तत्त्वज्ञान सक्रिय दर्शन मंदिरचे दिलीप भोयर, बीड जिल्हा संघटक परशुराम राठोड, सांगली जिल्हा सरचिटणीस धनपाल माळी कवठेमंकाळ तालुका महिला आघाडी अध्यक्ष बेगम बी शेख, पुणे सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर उस्मानाबाद या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here