बँकिंग क्षेत्रात वाढती स्पर्धा असतानाही सर्व खातेदार, भागधारक, ठेवीदार तसेच हितचिंतक यांच्या अतुट विश्वासावर आपल्या अजित नागरी सहकारी पतसंस्था व अजित मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीने प्रगतीचा शिरस्ता कायम ठेवण्यात यश मिळविले असल्याचे मत अजित नागरी सहकारी पतसंस्था चे चेअरमन माजी आमदार अशोक भाऊ टेकवडे यांनी व्यक्त केले. नुकताच अजित नागरी पतसंस्थेची 31 वी तर अजित मल्टीस्टेटची 10 वी सर्वसाधारण सभा संस्थेच्या सासवड येथील भव्य मुख्य शाखेच्या इमारतीत संपन्न झाली.पुढे चेअरमन अशोक टेकवडे म्हणाले की,संस्थेची यशस्वीतेची घोडदौड चालु ठेवीत असताना जनतेच्या मनात सहकारी संस्थाविषयी निर्माण झालेली साशंकता, दुसऱ्या बाजुला सहकारात्मक स्पर्धा, आर्थिक शिस्तिचे पालन यावर यश मिळविले, त्याचबरोबर ठेवीदारांमध्ये विश्वासर्हतेत वाढ करणे शक्य झाले आहे. त्यामुळे संस्थेच्या यशस्वीतेचा चढता आलेख पहावयास मिळत आहे.अजित नागरी सहकारी पतसंस्थेचे सचिव दिलीप वाल्हेकर यांनी संस्थेची आर्थिक वर्षातील माहिती देताना सांगितले की, अजित नागरी सहकारी पतसंस्था ही पुणे जिल्ह्यातील एक नामांकित पतसंस्था असून 29 जानेवारी 1992 रोजी या संस्थेची स्थापना झाली असून सासवड, हडपसर, मार्केटयार्ड,जेजुरी,उरुळी कांचन, निरा, उरुळी देवाची व कात्रज या ठिकाणी शाखा आहेत. या संस्थेचे अधिकृत भाग भांडवल हे तब्बल दहा कोटी रुपये आहे. तर ठेवींचा विचार केला तर सद्यस्थितीत साधारण 70 कोटी रुपयांपर्यंत ठेवीचा आकडा पोहोचला आहे. त्याचप्रमाणे सदरच्या ठेवींपैकी 69 कोटी रुपये हे कर्ज स्वरूपात वाटप केले आहे. सदरच्या आर्थिक वर्षात दीड कोटीपेक्षा जादा नफा कमवलेल्या या संस्थेने 9% सभासदांना लाभांश दिला असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ऑडिट वर्ग A मध्ये आहे. त्याचबरोबर अजित मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या 23 शाखा असून 38 हजार 355 एवढे सभासद आहेत. त्याचप्रमाणे अजित मल्टीचे पाच कोटी रुपये हे अधिकृत भांडवल आहे. ठेवीचा विचार केला तर 43 कोटी रुपये ठेवी यांच्या असून 36 कोटी रुपयाचे वाटप केले आहे. गेल्या आर्थिक वर्षात 11 लाख 26 हजार रुपये या संस्थेने नफा कमवला असून ऑडिट वर्ग A मध्ये ही संस्था कायम आहे.यावेळी अजित नागरीचे व्हाईस चेअरमन तानाजी चौधरी म्हणाले की, संचालक, कर्मचारी यांचे आचार, विचार दुरदृष्टी, भविष्याचा वेध घेणारी असणे गरजेचे आहे.केवळ कर्ज देऊन फक्त व्याज न घेता, काळाची पावले ओळखुन नव-नवीन योजना देण्याचा प्रयत्न केल्यामुळेच पुणे जिल्ह्यात विश्वासार्हता निर्माण होण्यास मदत होत आहे.यावेळी संचालक अजिंक्य टेकवडे की, सभासदांना ठेवीच्या व्याजदरानुसार लाभांश मिळवून देणे, सोने तारण, लॉकर्स सुविधा, कर्जदारांसाठी अपघाती विमा योजना उपलब्ध करुन दिल्या आहेत. कर्जदारांच्या अपघाती विमा योजनेअंतर्गत ज्या कर्जदारांचे दुर्देवाने अपघाती निधन झाले आहे यांच्या कुटुंबियास एक लाखापासून ते पाच लाखापर्यंत संस्थेच्या माध्यमातून कर्जदांरास आर्थिक मदतीचा हात उपलब्ध करुन दिल्यामुळेच हजारो सामान्य नागरिक विश्वासाने संस्थेबरोबर आर्थिक व्यवहार करीत असल्याचे समाधान वाटते. अजित नागरीचे सरव्यवस्थापक सतीश जाधव म्हणाले की कर्ज आणि ठेवी बरोबरच ग्राहकांना इतर सुविधा मिळाव्यात म्हणून डी.डी.ची सुविधा,सोने तारण योजना, मनी ट्रान्सफरची सुविधा, आर. टी. जी. एस. सुविधा , एस. एम. एस. बँकींग सुविधा, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमार्फत वीज बील भरणा सुविधा,कर्जदारांसह जामिनदारांचाही अपघात विमा संरक्षण,कोअर बँकींग सुविधा इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत.कोरोना नंतर प्रथमच मोठ्या स्वरूपात झालेल्या या दोन्ही संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस अजित नागरीचे चेअरमन अशोक भाऊ टेकवडे,व्हाईस चेअरमन तानाजी चौधरी,सचिव दिलीप वाल्हेकर, खजिनदार बाळासाहेब काळे, संचालक मंडळांमधील बाळासाहेब बडदे, ॲड सुभाष कोळपे, साधना दीडभाई, प्रभावती धुमाने, विजया टेकवडे, पंकज घोणे, उमेश चव्हाण सर व्यवस्थापक सतीश जाधव उपस्थित होते. तर अजित मल्टीस्टेटच्या चेअरमन विजयाताई टेकवडे, व्हाईस चेअरमन प्रवीण भोसले, संचालक मंडळांमधील अजिंक्य टेकवडे, सुरेखा ढमाले, सोनम साकोरे तर सर व्यवस्थापक ज्योती टेकवडे त्याचप्रमाणे अनेक सभासद व सर्व शाखांचे कर्मचारी उपस्थित होते.
Home Uncategorized सभासद व ग्राहकांच्या अतूट विश्वासावरच अजित नागरी पतसंस्था,अजित मल्टीस्टेट सोसायटीची प्रगती व...