सफाळा ( प्रतिनिधी: वैभव पाटील) दि. 30 डिसेंबर 2022 रोजी सकाळी अंदाजे 10 च्या सुमारास सफाळा पूर्व रेल्वे स्टेशन ते वैतरणा बाजूकडील रेल्वेच्या डिएफसीसीचे कच्या रोडचे काम सुरू असून, त्या रस्त्यावरून मोटर क्रेन क्रमांक M H – 48 / B H – 2847 हे वाहन सफाळा येथून वैतरणा बाजू कडे डिएफसीसीच्या कच्च्या रोडवरून रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून हयगयी व निष्काळजीपणाने मजुरासह भरधाव वेगात क्रेन चालवून घेऊन जात असताना, करवाळे गावाचे हद्दीत रस्ता चढ उतार असल्याने, वाहन चालक यांने अचानक क्रेनचा ब्रेक मारल्यानंतर यातील मयत इसम हा क्रेनचे समोरील बाजूस, रोडवर खाली पडुन, त्यांच्या अंगावरून सदर क्रेनचा टायर गेल्याने त्याच्या कमरेस, पोटावर, गंभीर दुखापत झाल्यानंतर त्यास सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असताना डाॅक्टर यांनी जखमी अनिल ब्रिजलाल सरोज वय वर्षे 22 यांना मृत घोषित केले. या संदर्भात फिर्यादी लालचंद नेफीलाल सरोज वय वर्षे 25 धंदा मजुरी रा. केळवा रोड ता,जि पालघर मुळगांव परसारा तालुका – चायला जिल्हा कौसांबी राज्य उत्तर प्रदेश. याने सफाळा पोलीस ठाणे ता,जि. पालघर येथे फिर्याद दिल्याने अपघाती गुन्हा रजि. नंबर 120 / 2022 भारतीय दंड संविधान कलम 304 ( अ ) 279, 337, 338 सह मोटर वाहन कायदा 148 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी – क्रेन क्रमांक M H – 48/ B H – 2847 – चालक – उपेंद्र शंभुनाथ पटेल राहणार खैराफाटा बोईसर ता,जि पालघर यास ताब्यात घेतले असून बाळासाहेब पाटील पोलीस अधिक्षक पालघर यांच्याअधिपत्याखाली व निता पाडवी – विभागीय पोलीस अधिकारी पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली सफाळा पोलीस ठाणे प्रभारी पोलीस अधिकारी अमोल गवळी सहा. पो. निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट दिली असून, त्याच्या निदर्शनाखाली तपसी अंमलदार महेंद्र शर्मा पुढील तपास करीत आहे.