भिगवण : रणजीत बजार हायस्कूल रोड भिगवण आयोजित मकर संक्रांतीच्या निमित्ताने भव्य ऑनलाइन मेहंदी स्पर्धा घेण्यात आली एक सामाजिक जबाबदारी व आपल्या ग्रामीण भागातील मुलींना महिलांना मेंदीची कला जोपासावी आपली संस्कृती पुढे यावी या उद्देशाने रणजीत बजार च्या वतीने सौ दिपाली भोंगळे चिरंजीव सुजित व प्रणित यांच्या संकल्पनेतून ही ऑनलाईन स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेमध्ये एकूण 578 स्पर्धकांनी भाग घेतला अतिशय सुंदर आखीव रेखीव अशा मेहंदी कला त्यानिमित्ताने पुढे आली हे सर्व करत असताना अतिशय अवघड काम म्हणजे विजेते काढणे आणि ते काम भिगवण मधीलच मेहंदी मध्ये तज्ञ असणार्या तेजश्री बोगावत,नाजिया शेख व तैहमीन शेख यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले या स्पर्धेमध्ये प्रथम विजेते पारितोषिक 1) कुमारी आरती बापू भोई राहणार कुंभारगाव 2) कु वृषाली संतोष काळे 3)कु साक्षी राजेभोसले 4) कु प्रतिमा राहुल अनपट यांना देण्यात आले यावेळी मुक्ताई टेक्स्टाईल चे प्रोप्रायटर बाळू शेठ चौरे श्री राजे भोसले व रणजीत बाझार चा पूर्ण स्टाफ उपस्थित होता.