निमगाव केतकी, ता.31. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बद्दल संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ निमगाव केतकी येथे बुधवारी इंदापूर तालुका माळी परिषद व फुले प्रेमी संघटनांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
आज सोमवारी सायंकाळी सात वाजता श्री संत सावता माळी मंदिराच्या प्रांगणात इंदापूर तालुका माळी परिषदेची संभाजी भिडे यांच्या निषेधार्थ बैठक घेण्यात आली. या बैठकीत संभाजी भिडे यांच्या वरती गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी बुधवारी 2 ऑगस्ट रोजी इंदापूर बारामती रस्त्यावरती निमगाव केतकी येथील व्याहाळी चौकात सकाळी नऊ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी भिडे यांच्या पुतळ्यास जोडो मारो आंदोलन व पुतळा दहन करण्यात येणार आहे.
आजच्या बैठकीस इंदापूर तालुका माळी परिषदेचे अध्यक्ष एडवोकेट कृष्णाजी यादव, इंदापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष देवराज जाधव, माजी सभापती दत्तात्रय शेंडे, उद्योजक वसंत मोहोळकर, इंदापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी संचालक गणपत भोंग, कर्मयोगी कारखान्याचे संचालक राहुल जाधव, माणिक भोंग, संतोष हेगडे, किरण म्हेत्रे, दत्ता मिसाळ, प्रवीण डोंगरे, शशिकांत शेंडे, संजय मस्के, राजू भोंग, नितीन शेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
Home Uncategorized संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात निमगाव केतकी येथे बुधवारी होणार रास्ता...